अहमदनगर : आठ महसूल मंडलात एक इंचापेक्षा अधिक पाऊस

सर्वाधिक श्रीरामपूरच्या उंदिरगाव आणि नगरच्या वाळकीमध्ये : जिल्ह्याची सरासरी 13.8 मि.मी.
अहमदनगर : आठ महसूल मंडलात एक इंचापेक्षा अधिक पाऊस
पाऊसRain

अहमदनगर (प्रतिनिधी) - जिल्ह्यात दोन दिवसांपासून कमी अधिक प्रमाणात विस्कळीत स्वरूपात मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे. शनिवारी जिल्ह्यातील 97 पैकी आठ महसूल मंडळात एक इंचापेक्षा (40 मिली मीटरपेक्षा) जास्त पावसाची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक पावसाची नोेंद ही श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव मंडलात 67.3 मि.मी आणि नगर तालुक्यातील वाळकी मंडळात 66.8 मि.मी. पावसाचा समावेश आहे.

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्‍यानूसार जिल्ह्यात मान्सून पूर्व वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात 14 तालुक्यात 97 महसूल मंडळे असून यातील आठ मंडळात एकाच दिवशी एक इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून कर्जत मंडळात 39 मि.मी. म्हणजेच जवळपास एक इंच पाऊस झालेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्यांच्या पूर्व तयारीला वेग येणार आहे. तर दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यात कडधान्यांच्या तयारीला सुरूवात होणार आहे. जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह, विजांच्या कडकडासह पावसाला सुरूवात झाली. यामुळे अनेक भागात वीज गायब झाली. काही तालुक्यात वादळामुळे घरांवरील पत्रे उडाले असून संगमनेर तालुक्यात वीज पडून एका व्यक्तीसह काही शेळ्या दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे. एक इंचापेक्षा अधिक पाऊस झालेल्या महसूल मंडळात चिचोंडी पाटील, वाळकी आणि रुईछत्तीशी (नगर) देवदैठण (श्रीगोंदा), खर्डा (जामखेड), कोरडगाव (पाथर्डी), कोतुळ (अकोले) आणि उंदिरगाव (श्रीरामपू) यांचा समावेश आहे. जिल्ह्यात सरासरी 13.8 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

...............

तालुकानिहाय पाऊस (मि.मी)

नगर 27.9, पारनेर 13.8, श्रीगोंदा 13.3, कर्जत 17.3, जामखेड 31.3, शेवगाव 14.6, पाथर्डी 13.8, अकोले 13.2, नेवासा 8.1, राहुरी 4.7, संगमनेर 6, कोपरगाव 4.2, श्रीरामपूर 19.6, राहाता 3.6 असे आहेत.

..............

या ठिकाणी प्रतिक्षा

जेऊर (नगर), वडझिरे (पारनेर), राशिन (कर्जत), नेवासा खुर्द आणि सोनई (नेवासा), वांबोरी (राहुरी), आश्‍वि, पिंपळनेर, शिपलापूर (संगमनेर), रवांदे (कोपरगाव) आणि टाकळीभान (श्रीरामपूर) या ठिकाणी शनिवारी थेंबभरही पाऊस झालेला नसून या मंडलातील शेतकर्‍यांना प्रवासाची प्रतिक्षा आहे.

Related Stories

No stories found.