गाव, वाड्या-वस्त्यांवर लसीकरण मोहीम

गाव, वाड्या-वस्त्यांवर लसीकरण मोहीम

'मिशन कवचकुंडल' मोहिमेसाठी प्रशासन सज्ज

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

'मिशन कवचकुंडल' मोहिमेअंतर्गत (Mission Kavach Kundal) जिल्ह्यातील गाव, वाड्या, वस्त्यांमध्ये लसीकरण (vaccination) कॅम्प लावून ज्यांचे लसीकरण बाकी आहे. अशा व्यक्तींचे लसीकरण (COVID-19 Vaccination) पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. लसीकरण मोहिमेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) यांनी दिली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) आयोजित टास्क फोर्स (Task Force) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या मोहिमेला कालपासून जिल्ह्यात सुरूवात झाली आहे. यासाठी महसूल, आरोग्य, जिल्हा परिषद व नगरपरिषद प्रशासनाचे एकमेकांच्या समन्वयाने जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये १६ जानेवारीपासून कोविड लसीकरण (Corona Vaccination) कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमांतर्गत १८ वर्षांवरील एकूण ३६ लाख तीन हजार ६०० लाभार्थ्यांचे लसीकरण करणे अपेक्षित असून आत्तापर्यंत साधारणपणे ६० टक्के लाभार्थींना पहिला डोस व २१ टक्के लाभार्थींना दुसरा डोस देऊन संरक्षित करण्यात आले आहे. या अनुषंगाने शिल्लक राहिलेल्या लाभार्थीचा पहिला डोस व देय असलेल्या लाभार्थीचा दुसरा डोस लवकरात लवकर पूर्ण करणे आवश्यक आहे. या उद्दिष्टाची पुर्तता करण्यासाठी जिल्ह्यामध्ये ८ ते १४ ऑक्टोबर या कालावधीमध्ये मिशन कवच कुंडल लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. याकरिता ग्रामिण भागामध्ये प्रत्येक उपजिल्हा, ग्रामिण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येकी लसीकरण सत्रे, तसेच महानगरपालिक कार्यक्षेत्रामध्ये ४० लसीकरण सत्र असे एकूण दैनंदिन ६५० लसीकरण सत्रांचे नियोजन करण्यात आलेले आहे.

मोहिमेकरिता अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यासाठी पुरेशा प्रमाणात लससाठा उपलब्ध झालेला आहे. या मोहिमेकरिता आरोग्य विभाग, महसूल विभाग, महिला बालकल्याण विभाग, शिक्षण विभाग, ग्रामपंचायत विभाग इ. विभागांचा सहभाग घेण्यात येणार आहे. (Ahmednagar Vaccination)

मिशन कवच कुंडल कोविड १९ लसीकरण मोहिमेकरिता जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समितीची बैठक शुक्रवारी घेण्यात आली. जिल्ह्यातील ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही त्यांनी मिशन कवच कुंडल कोविड १९ लसीकरण मोहिमेमध्ये लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा आरोग्य व शिक्षण समिती सभापती प्रताप शेळके पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. संदीप सांगळे यांनी केले आहे.

नगर शहरात दररोज २१ हजार नागरिकांना लस

नगर शहरामध्ये आगामी सात दिवसांत दररोज २१ हजार नागरिकांना करोनाची लस देण्याचे नियोजन महापालिकेकडून करण्यात आले आहे. मनपाकडून आरोग्य केंद्र निहाय कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. आरोग्य केंद्रांना लसीकरणाचे टार्गेट देण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात हे लसीकरण केले जाणार असल्याची माहिती महापौर रोहिणी शेंडगे यांनी दिली. नागरिकांनी करोनाची लस घेऊन स्वत: ला व कुटुंबाला सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त शंकर गोरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com