अहमदनगर (प्रतिनिधी) - नगर शहरातील सावेडी नाट्यगृहासाठी 5 कोटी आणि बाळासाहेब देशपांडे रुग्णालयाला 5 कोटी असा 10 कोटींचा निधी मंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे घोषित केला.

नगर महापालिकेचा खर्च उत्पन्नापेक्षा दुप्पट आहे. तो कमी करावा किंवा उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावे, अशी सूचना करत सरकार सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले. उड्डाणपुलाला स्व. अनिल राठोड यांचे नाव देण्यासंदर्भात ठराव करून तो शासनाकडे पाठवा, अशी सूचना ना. शिंदे यांनी केली.

महापौरांची कानटोचणी!

शिवसेना नगरसेवकांच्या तक्रारीनंतर मंत्री शिंदे यांनी विकासकामांत राजकारण आणू नका, अशा शब्दांत महापौरांना फटकारले. सगळ्यांना निधी दिला, अशी सारवासारव महापौरांनी केली.