अहमदनगर (प्रतिनिधी) -

नगरमध्ये केेंद्र सरकार संचलित व्हीआरडीई या संस्थेच्या स्थलांतराला अखेर ब्रेक लागला आहे. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी

मंगळवारी व्हीआरडीईच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत तीन तास बैठक घेतल्यानंतर व्हीआरडीईच्या स्थलांतराची गरजच नसल्याचा विश्वास खा.डॉ. विखे पाटील यांनी व्यक्त केेला आहे.

देशात तयार होणार्या सर्व प्रकारची वाहने आणि संरक्षक दलासाठी आवश्यक असलेल्या वाहनांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र देण्याचे काम नगरच्या व्हीआरडीईचे आहे. व्हीआरडीईच्या मान्यतेशिवाय देशात कोणतेच वाहन रस्त्यावर उतरू शकत नाही, अशी ही महत्वाची संस्था आहे. नगरच्या या संस्थेत अधिकारी व कर्मचारी, कामगार असे जवळपास 1 हजार जण कार्यरत असून त्यांचा कुटूंबांचा उदरनिर्वाह व्हीआरडीई या संस्थेवर अवलंबून आहे. यासह या 1 हजार कुटूंबाला लागणार्या जीवनावश्यक वस्तू व इतर गरजांवर अनेक व्यवसायिक अवलंबून आहेत. गेल्या 20-25 वर्षांपासून संस्थेत काम करणारे नगरमध्येच स्थायिक झालेले आहेत. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून याच व्हीआरडीच्या स्थांलातराच्या चर्चेमुळे येथील अधिकारी आणि कर्मचार्यांमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. या संस्थेचे स्थलांतर होवू नयेत, यासाठी येथील कर्मचार्यांनी व्हीआरडीई बचाओ समिती स्थापन सुरू करून लढा सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी खा. डॉ. विखे पाटील यांनी व्हीआरडीच्या वरिष्ठ अधिकार्यांसोबत तीन तास बैठक घेतली. या बैठकीनंतर या संस्थेचे स्थालांतराची आवश्यकता नसल्याचा विश्वास खा. डॉ. विखे यांनी व्यक्त केला आहे. लवकरच याबाबत सविस्तर वृत्त हाती येणार आहे.