१५ सप्टेंबरला सभापती निवडीसाठी सभा

राजकीय घडामोडींना वेग
१५ सप्टेंबरला सभापती निवडीसाठी सभा

अहमदनगर (प्रतिनिधी)

महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) महिला व बालकल्याण समितीच्या (Women and Child Welfare Committee) रिक्त झालेल्या सभापती, उपसभापती निवडीसाठी १५ सप्टेंबरला सभेचे आयोजन केले आहे.

या सभेला पिठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale) असणार आहे. याबाबतचा आदेश नाशिक विभागीय आयुक्तांकडून महापालिकेला प्राप्त झाला आहे.

महापालिकेत महाविकास आघाडीची (Mahavikas Aaghadi) सत्ता असलेल्यानंतर महिला व बालकल्याण समिती विसर्जित केली होती. यानंतर महापौर रोहिणी शेंडगे (Mayor Rohini Shendge) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत नव्या १६ सदस्यांची महिला व बालकल्याण समितीवर नियुक्ती करण्यात आली. यामध्ये राष्ट्रवादीचे (NCP) ६, शिवसेना (Shivsena) ५, भारतीय जनता पक्ष (BJP) ४, काँग्रेस (Congress) व बसप (BSP) प्रत्येकी एका सदस्याचा समावेश आहे.

दरम्यान, सभापतिपदासाठी काँग्रेस इच्छुक असली, तरी शिवसेनेने या पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. १५ सप्टेंबरला निवड होणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com