खड्डे नीट बुजवा नाहीतर कारवाई

महापौर बाबासाहेब वाकळे: पॅचिंग कामाची अचानक पाहणी
खड्डे नीट बुजवा नाहीतर कारवाई

अहमदनगर (प्रतिनिधी) - अहमदनगर शहरातील रस्ते पॅचिंगचे काम सुरू असून पॅचिंग दर्जेदार करा. कामात हलगर्जीपणा झाल्यास कारवाई केली जाईल असा सज्जड इशारा महापौर बाबासाहेब वाकळे यांनी अधिकारी व ठेकेदाराला दिला आहे. महापौर वाकळे यांनी आज शहरात सुरू असलेल्या पॅचिंगच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते.

शहर व उपनगरात सुरू असलेलया पॅचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे अचानकपणे आले. शहर अभियंता सुरेश इथापे, अभियंता मनोज पारखे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव यावेळी उपस्थित होते.

नगर शहरामध्ये पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले आहे. खड्डयामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. पावसामध्ये आता पावसाळा संपला आहे. परतीच्या जोरदार पावसाने पॅचिंगचे काम थांबले होते. आता ते पुन्हा नव्याने सुरू आहे. शहर व उपनगरात एकाच वेळी पॅचिंगचे काम सुरू आहे. महापौर वाकळे यांनी अचानक पॅचिंगच्या कामाची पाहणी केली. शहर अभियंता इथापे यांना पॅचिंगचे काम दर्जेदार करण्याच्या सुचना महापौर वाकळे यांनी दिली. कामात हलगर्जीपणा झाल्यास संबंधीतांवर कारवाई करण्यात येईल असेही ते म्हणाले.

पॅचिंगचे काम झाल्यानंतर नागरिकांना दिलासा मिळणार आहे. नगर शहरातून महामार्ग व राज्यमहामार्गाचे रस्ते जात असून त्यावरही मोठे खड्डे पडलेले होते. बांधकाम विभागाकडून हायवेवरील पॅचिंगचे काम सुरू असल्याचे वाकळे यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com