नगरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवू

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे आश्वासन
नगरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर शहरातील बाजारपेठांमधील (Nagar City Market) अतिक्रमणाचा प्रश्न (Question of Encroachment) कायम स्वरूपी मार्गी लागण्यासाठी नगर व्यापारी महासंघाने मार्च महिन्यांत उपोषण व आंदोलन (Movement) केले होते. त्यावेळी महापालिका आयुक्तांनी (Municipal Commissioner) लेखी आश्वासन देऊनही अतिक्रमणाचा (Encroachment) प्रश्न सुटलेला नसल्याने व्यापार्‍यांच्या शिष्टमंडळाने रविवारी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Minister of State for Urban Development Prajakt Tanpure) यांची राहुरी (Rahuri) येथे संपर्क कार्यालयात भेट घेवून निवेदन दिले.

नगरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवू
वर्गात आढळली आंतरवस्त्रे व कंडोम पाकिटे

यावेळी मंत्री तनपुरे (Minister of State Urban Development Prajakt Tanpure) यांनी व्यापारी शिष्ठमंडळाच्या सर्व मागण्या व परिस्थिती समजून घेतली. तातडीने महापालिका आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore) यांना संपर्क करून अतिक्रमण करणार्‍यांवर काय कारवाई केली याबाबत चौकशी करून चर्चा केली. लवकरच विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांची एकत्रित बैठक नगरमध्ये घेवून बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी सर्व व्यापार्‍यांना सहकार्य करू असे आश्वासन मंत्री तनपुरे यांनी यावेळी दिले. व्यापारी शिष्ठमंडळात जागरूक नागरिक मंचाचे अध्यक्ष सुहास मुळे, अहमदनगर व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ईश्वर बोरा, बजरंग दलचे कुणाल भंडारी, ओमप्रकाश बायड, सागर पेठकर, अभिमन्यू जाधव, वंदे मातरम् युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी किथानी, प्रतीक बोगावत, सौरभ भांडेकर, ऋषी येवलेकर, संतोष ठाकूर, विजय आहेर, कुणाल नारंग, अमित नवलनी आदी व्यापारी उपस्थित होते.

नगरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवू
राहुरीत दरोडेखोरांची टोळी जेरबंद

मंत्री तनपुरे यांच्याशी चर्चा करताना व्यापारी म्हणाले, नगरची बाजारपेठ ही शहराची शान आहे. या बाजारपेठेमुळे नगरचे नाव जगात पोहोचले आहे. मात्र गेल्या अनेक वर्षापासून अतिक्रमांच्या विळख्यात ही बाजारपेठ सापडली आहे. त्यामुळे सर्व व्यापारीवर्ग आंदोलन करीत असून मनापा प्रशासन कोणतेही सहकार्य करीत नाहीये. उलट अतिक्रमण करणार्‍यांना पाठीशी घालत आहे. या प्रश्नात तातडीने लक्ष घालून कायमस्वरूपी सोडवावा अशी मागणी त्यांनी केली. मुळे म्हणाले, जागरूक नागरिक मंचाने व्यापारीवर्गाने सुरु केलेल्या आंदोलनास पाठींबा दिला आहे. बाजारपेठेतील व्यापारी प्रामाणिकपणे सर्वप्रकारचे कर भरूनही त्यांना सुविधा मिळत नाहीये. प्रत्येक दुकानासमोर होत असलेल्या अतिक्रमणांचा त्रास व्यापारीवर्गा बरोबरच सर्व नागरिक व महिलांना होत आहे.

नगरच्या बाजारपेठेतील अतिक्रमणाचा प्रश्न सोडवू
‘माझी वसुंधरा अभियानात’ पाच ग्रामपंचायती अव्वल

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com