बाजार समितीकडून कामगारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव

बाजार समितीकडून कामगारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव

राज्य सहकार निवडणूक प्राधिकरणकडे तक्रार

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यात हमाल व मापाडी विभाग या विभागाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्याचा कायद्याने अधिकार असल्याचे हमाल कामगार किसन सानप यांनी म्हटले आहे. परंतु, नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अधिकारी जाणून-बुजून महिला कामगार, हमाल व मापाडी कर्मचार्‍यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप सानप यांनी केला आहे.

महिला कामगार, मापाडी, व हमाल कामगार हे सर्व अडाणी असल्याने व कायद्याचे ज्ञान नसल्याने गेल्या दोन वर्षापासून आमचे परवान्यांचे जाणून-बुजून करोनाचे कारण देत नुतनीकरण करून देण्यास टाळाटाळ करत आहेत. येत्या निवडणुकीमध्ये आम्हाला मतदानापासून वंचित ठेवण्याचा डाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही अधिकारी करीत आहेत. लवकरात लवकर महिला कामगार हमाल व मापाडी यांच्या परवान्याचे नूतनीकरण करण्याच्या मागणीचे निवेदन राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण आयुक्त व सचिव यांना हमाल कामगार किसन लिंबाजी सानप यांनी पाठवले आहे.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com