दुकान बंद, वर्दळ सुरूच

अत्यावश्यक सेवा वगळता इतर दुकाने बंदचे आदेश आणि दुसरीकडे कोरोनाची धास्ती. अशा दुहेरी संकटात सापडलेल्या व्यापार्यांनी दुकाने बंद ठेवली. कापड बाजार आणि सराफ मार्केट बंदमुळे त्याचा परिणाम आर्थिक उलाढाल ठप्प होण्यात झाला. बाजारपेठेतील दुकाने बंद असली तरी नागरिकांची वर्दळ मात्र सुरूच होती. पाचपेक्षा जास्त लोकांना जमावबंदी असली तरी अनेक ठिकाणी त्याचा फज्जा उडाल्याचे पहावयास मिळाले.

चोरी चोरी छुपके छुपके...

व्यापारपेठेतील मोठी दुकाने बंद असली तरी किरकोळ विक्रेत्यांनी शटर बंद करून आतमध्ये व्यावसाय सुरू असल्याचे दिसून आले. विशेषत: पाईपलाईन रोडवरील व्यावसायिकांनी हा चोरी छुपके फंडा वापराल्याचे दिसून आले. टपरी बंद करून शेजारी स्कूरवर बसून पान, तंबाखू,सिगारेट, मावाची विक्री सुरू असल्याचेही दिसून आले.

सराफ बाजारात शुकशुकाट

लग्नसराई सुरू असली तरी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमावलीमुळे सराफ बाजार आज बंद होता. सराफी दुकाने बंद असल्याने लग्नासाठी सोने खरेदी करणार्यांची पंचायत झाली आहे. मंगल कार्यालयात कोरोना टेस्ट रिपोर्ट निगेटिव्ह प्रमाणपत्र सक्तीचे करण्यात आल्याचे वर आणि वधूबापाच्या कुटुंबासह वर्हाडींनी टेस्टींगसाठी स्वॅब संकलन केंद्रात गर्दी केल्याचे दिसून आले.