अहमदनगर | प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मुंबईतील (Mumbai) आझाद मैदान (Azad Maidan) येथे उपोषणाला बसलेल्या खा. छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje)....
यांना पाठिंबा देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चा (Maratha Kranti Morcha) जिल्ह्याच्या वतीने नगर (Ahmednagar) शहरातील जुन्या बस स्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यासमोर उपोषण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करत अशोकराव चव्हाण, सुरेखाताई सांगळे, दत्ता वामन, रावसाहेब काळे, ओमकार घोलप, सागर ठोंबरे, योगेश खेडके, आशाताई गायकवाड, विलास तोरडमल, सागर मिसाळ, किरण फटांगरे, मयुर भापकर, अंकुश भापकर, शुभम कोमाकुल, श्रीकांत लगड, आकाश भोसले, निखिल गहिले, देविदास मुदगल, सागर गुंजाळ आदीसह उपोषणाला बसले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे तसेच विविध मागण्यांसाठी उपोषण करण्यात आले आहे.