अहमदनगर : महापौर निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार

उपमुख्यमंत्री पवार, नगर विकासमंत्री शिंदे यांच्या मुंबई बैठकीत निर्णय
अहमदनगर : महापौर निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढणार
अहमदनगर महापालिका

अहमदनगर (प्रतिनिधी) - महापालिकेच्या महापौर निवडणूकीच्या संदर्भात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. महापौर पदाच्या निवडणूकीत महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे बैठकीत ठरले आहे. यावेळी शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊ कोरगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे आ. संग्राम जगताप, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक अनिल शिंदे, गणेश कवडे, अनिल बोरुडे, संजय शेंडगे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महानगरपालिकेमध्ये याअगोदर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस अशी एकत्रितपणे सत्ता होती. राज्यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना झाली. त्यानंतर राजकीय गणितेही बदलली गेली आहे. सध्या नगर महापालिकेमध्ये शिवसेनेचे 23, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 19, असे नगरसेवक आहेत. तर काँग्रेसचे पाच नगरसेवक आहे. भाजपचे 15, अपक्ष एक तर बसपा 4 असे एकूण 67 चे संख्याबळ महानगरपालिकेमध्ये सध्या कार्यरत आहे. एक जागा ही रिक्त असून त्या जागेवर पोटनिवडणूक झालेली नाही. एकूण 68 पैकी 67 नगरसेवक सध्या कार्यरत आहेत.

विद्यामान महापौर पदाचा कार्यकाळ 30 जून रोजी संपत असल्यामुळे नव्याने महापौरपदाची निवडणूक होणार आहे. महापौर पदाकरता आरक्षण निश्‍चित झालेले असून हे महापौर पद अनुसूचित जाती महिला या प्रवर्गाकरिता निश्‍चित करण्यात आलेले आहे. राजकीय घडामोंडीना वेग आला असून महापौर कोणाचा होणार याकडे लक्ष लागून आहे.

अहमदनगर महापालिका
अजित दादा हे शरद पवारांचे ऐकत नाही हे माहिती होते , पण...

महापौर पद कोणाकडे?

मंगळवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांसह स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. महाविकास आघाडी एकत्र लढण्याचे ठरले असले तरी महापौर, उपमहापौर पद कोणाकडे असेल हे अजून ठरले नाही. पुढील एक दोन दिवसांमध्ये यावर निर्णय अपेक्षित असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्वाधिक 23 नगरसेवक शिवसेनेचे असून त्या खालोखाल राष्ट्रवादीचे 19 नगरसेवक आहे. यामुळे महापौर शिवसेनेचा होणार की, राष्ट्रवादीचा हे मात्र अजून ठरले नाही.

30 जूनला सभा

महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी 30 जून रोजी सकाळी 11 वाजता सभा होणार आहे. विभागीर आरुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी रांच्रा अध्रक्षतेखाली ही सभा पार पडणार आहे. 30 जून रोजी पहिल्रा महापौरांची मुदत संपत असल्रामुळे नव्राने महापौर व महापौर रांची निवड जाहीर होणार आहे. त्रासाठी मंगळवारी विभागीर आरुक्तांनी निवडणुकीचा कार्रक्रमाची तारीख जाहीर केलेले आहे. आज (बुधवार) अधिकृतपणे निवडणुकीचा कार्रक्रम जाहीर होणार आहे.

अहमदनगर महापालिका
भाजपशी जुळवून घेण्यासंदर्भातील ‘त्या’ पत्रावर जयंत पाटील म्हणाले...

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com