Photo : प्रशासनाचे आदेश धाब्यावर

Photo : प्रशासनाचे आदेश धाब्यावर

सावेडीत भाजी खरेदीसाठी तोबा गर्दी

अहमदनगर | Ahmedagar

शहरामध्ये करोनाचे वाढते संक्रमण पाहता आज मध्यरात्रीपासून सात दिवसांचा कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.

किराणा, भाजी बाजार याशिवाय सर्व आस्थापना बंद ठेवण्याचा आदेश काढण्यात आला आहे. वैद्यकीय सेवा व दूध सुरू राहणार आहे. आठ दिवस बंदच्या पूर्व संध्येला आज सकाळीच नागरिकांनी सावेडी उपनगरात भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. प्रशासनाचे आदेश झुगारून एकविरा चौकात भाजी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे चित्र दिसले.

शहरात वाढत असलेल्या करोना संसर्गामुळे सर्वच धास्तावले आहेत. काल जिल्ह्यात 4 हजारांच्या पुढे रुग्णसंख्या आढळून आली. यात नगर शहरात 817 व्यक्तींना करोना संसर्गाचे निदान झाले. शहराचे आमदार संग्राम जगताप, मनपा आयुक्त शंकर गोरे व अधिकाऱ्यांनी तातडीने बैठक घेत सात दिवसांचे कडक लॉकडाऊन करण्याचा निर्णय जाहीर केला.

सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय झाल्याने व हा आदेश आज मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याने नागरिकांनी आज सकाळपासून ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी केली होती. करोना संसर्ग वाढत असताना नागरिकांनी बेजबाबदारपणाने खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com