<p><strong>अहमदनगर (प्रतिनिधी) - तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला सुरू असलेल्या क्लबवर एलसीबी पोलिसांनी काल गुरूवारी रात्री छापा टाकला. या छाप्यात सात जुगार्यांना अटक करण्यात आली असून राजूमामा जाधव मात्र पसार झाला आहे. पोलिसांनी सुमारे 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.</strong></p>.<p>पवन झुंबरलाल कोठारी (रा.शिरूर, पुणे), विनोद डॅनियल ससाणे (रा. सिध्दार्थनगर), गुलाब मौला शेख (आष्टी,बीड), शामसुंदर बारकू रोकडे (रा.तोफखाना), संतोष अशोक कोठेकर (रा.सिव्हील हडको), रमेश गोपीनाथ मिसाळ (रा. हातमपुरा) आणि दत्तात्रय खुशालचंद गिरमे (रा.केडगाव) अशी अटक केलेल्या जुगार्यांची नावे आहेत. पोलिसांना पाहताच राजूमामा जाधव मात्र पसार झाला. </p><p>तोफखाना परिसरातील जंगूभाई तालीमच्या अडोशाला पत्त्याचा जुगार सुरू असल्याची माहिती खबर्याकडून पोलिसांना समजली. एलसीबीचे एपीआय शिरीषकुमार देशमुख यांच्या पथकाने सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तेथे छापा टाकला, त्यावेळी जुगारी गोलाकार बसून तिरट नावाचा जुगार खेळताना मिळून आले. कॉन्स्टेबल रोहित येमुल यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.</p>