किरण काळे काँग्रेसचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष
सार्वमत

किरण काळे काँग्रेसचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष

प्रदेशाध्यक्ष ना. थोरात यांची घोषणा

Arvind Arkhade

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहर काँग्रेसमध्ये शुक्रवारी अचानक फेरबदल करण्यात आले. किरण काळे यांची शहरजिल्हा काँग्रेसच्या प्रभारी शहर जिल्हाध्यक्षपदी निवड करीत असल्याची घोषणा स्वतः प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या बैठकीमध्ये केली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या मान्यतेने नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी आ. डॉ. सुधीर तांबे, आ. लहू कानडे, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, मावळते शहरजिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, समन्वयक ज्ञानदेव वाफारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, जि.प. चे गटनेते अजय फटांगरे, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून जिल्हा युवक काँग्रेस आणि एनएसयुआय संघटनेच्या आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी ना थोरात म्हणाले, काळे हे चांगले संघटक आहेत. आम्ही त्यांची जबाबदारी वाढवत आहोत. शहर काँग्रेससाठी आता किरण यांच्या रूपाने तरुण नेतृत्व देत त्यांच्यावरती प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी मी सोपवत आहे. माजी नगरसेवक चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे शहरातील ज्येष्ठ सहकारी आहेत.

त्यांना राज्य पातळीवरती संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच काळे यांच्यावर शहरजिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळतानाच युवक काँग्रेस आणि विद्यार्थी काँग्रेसची जिल्हा समन्वयक पदाची देखील जबाबदारी त्यांच्यावर कायम ठेवत असल्याचे ना. थोरात यांनी सांगितले.

आगामी काळात 2014 प्रमाणे जर विधानसभेची निवडणूक स्वतंत्रपणे लढावी लागली तर किरण काळे यांना नगर शहरातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी करावी लागेल, असे म्हणत ना. थोरात यांनी किरण काळे यांना थेट विधानसभेच्या तयारीला लागण्याचे आदेश यावेळी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये दिले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com