बोठेच्या संपर्कातील आणखी चौघांची नावे समोर

बोठेच्या संपर्कातील आणखी चौघांची नावे समोर

बोठेच्या संपर्कातील आणखी चौघांची नावे समोर

अहमदनगर (प्रतिनिधी)- रेखा जरे हत्या प्रकरणात फरार असताना बाळ बोठेला मदत करणार्‍या दोघांचे कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यामुळे त्यांचे जबाब अपुरे राहिले आहेत. दरम्यान मदत करणार्‍यांची आणखी चार नावे पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून समजली. तपासी अधिकारी डीवायएसपी अजित पाटील यांनी या माहितीला दुजोरा दिला.

30 नोव्हेंबरच्या रात्री पुणे हायवेवरील जातेगाव घाटात यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येचा सूत्रधार पत्रकार बाळ.ज.बोठे असल्याचे समोर येताच तो पसार झाला. शंभर दिवस पसार असलेल्या बोठेला पोलिसांनी हैदराबादेतून अटक केली. पोलीस कोठडीत चौकशी पूर्ण झाली असून तो आता न्यायालयीन कोठडीत आहे.

फरार असतानाच्या काळात बोठेला मदत करणार्‍यांची नावे पोलिसांनी धुंडाळून काढली आहेत. गत आठवड्यात पाच जणांची चौकशी करत पोलिसांनी त्यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यातून आणखी चार नवीन नावे समोर आली आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तसेच दोन नामांकित व्यक्तींचा नव्या नावांमध्ये समावेश असल्याचे समजते.

मदत करणार्‍यांची चौकशी सुरू असतानाच दोघांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे त्यांचा अधुरा जबाब कोरोनामुक्त झाल्यानंतर घेतला जाईल असे तपासी अधिकारी पाटील यांनी सांगितले.

  • जबाब चार्जशीटला

  • आरोपी बोठेविरोधात चार्जशीट तयार करण्याचे काम पोलिसांत सुरू आहे. अटकेपासून 90 दिवसांत चार्जशीट कोर्टात दाखल करावे लागते. या चार्जशीटमध्ये मदत करणार्‍यांचे जबाब जोडले जाणार आहेत. आरोपी बोठे विरोधात हा भक्कम पुरावा असेल असा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com