कारची दुचाकीला धडक; दोघे जखमी

File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

स्वीफ्ट कारने (Swift Car) दुचाकीला (Bike) पाठीमागून दिलेल्या धडकेत (Collision) दुचाकीवरील दोघे जखमी (Injured) झाले आहेत. मनोहर लक्ष्मण अडागळे (वय 45 रा. सारसनगर, अहमदनगर) व ज्ञानेश्वर लहू घोरपडे अशी जखमी (Injured) झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. अहमदनगर- जामखेड रोडवरील (Ahmednagar-Jamkhed) आठवड (ता. नगर) गावच्या शिवारात हा अपघात (Accident) झाला. या प्रकरणी अज्ञात स्वीफ्ट कार चालकाविरूध्द नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) गुन्हा दाखल (Filed a Crime) करण्यात आला आहे. जखमी अडागळे यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी अडागळे व घोरपडे हे दुचाकीवरून अहमदनगर-जामखेड रोडने (Ahmednagar-Jamkhed Road) आठवड गावच्या शिवारातून जात असताना अहमदनगरकडून जामखेडकडे जाणार्‍या स्वीफ्ट कार चालकाने फिर्यादी यांच्याकडील दुचाकीला धडक दिली. या धडकेत फिर्यादी व त्यांचे मित्र जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com