आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

लाखो रुपयांचे पगार बुडवून आयटी कंपन्यांनी पोबारा केल्याचा काँग्रेसचा आरोप
आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा

अहमदनगर | Ahmednagar

एमआयडिसीतील (MIDC) आयटी पार्कच्या (IT Park) नावे स्थानिक आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांनी तरूणाईला गंडा घातल्याचा आरोप काँग्रेसने (Congress) केला आहे. अनेक तरूणांचे लाखो रुपयांचे पगार बुडवून आयटी कंपन्यांनी (IT companies Ahmednagar) पोबारा केल्याचे शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी म्हटले आहे.

काळे यांनी आयटीपार्कबाबत (Ahmednagar IT Park) अनेक गंभीर आरोप केले आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या (2019 Assembly Elections) तोंडावर आ.जगताप (MLA Jagtap) यांनी आयटी पार्कच्या नावाखाली कांगावा केला. तीन हजार पेक्षा जास्त तरुण-तरुणींच्या मुलाखती आयुर्वेद येथील खाजगी कार्यालयात घेतल्या. यातील अनेकांना नोकर्‍या दिल्या. पण ज्यांना नोकर्‍या दिल्या त्यांचे कोट्यवधी रुपयांचे पगार बुडवून त्यांना हाकलून देण्यात आले आहे.

आयटी पार्कच्या नावे आमदारांकडून गंडा
MPSC : संयुक्त पूर्व परीक्षा ४ सप्टेंबरला, ...अशी होणार जिल्ह्यात परीक्षा

दोन वर्षापूर्वी आयटी पार्क (IT Park Ahmednagar) सुरू झाला. करोना (COVID19) संकटकाळामध्ये जगातील अनेक व्यवसाय बुडीत निघाले. मात्र आयटी क्षेत्र याला अपवाद होते. आयटीमध्ये कुणाच्याही नोकर्‍या गेल्या नाहीत. आटी पार्कमध्ये प्रत्यक्ष भेट दिली असता त्याठिकाणी फक्त एका फायनान्स कंपनीच्या (Finance Company) वसुलीसाठी कॉल सेंटर (Call center) म्हणून काम करणारी बिपिओ कंपनी (BPO Company), सहा-सात लोकं काम करणारी ईआरपी डेवलपमेंट कंपनी (ERP Development Company) आढळून आली. या व्यतिरिक्त त्या ठिकाणी कोणतीही आयटी कंपनी आढळून आली नसल्याचे काळे यांनी म्हटले आहे. या ठिकाणी आयटी कंपन्यांऐवजी लॉजिस्टिक कंपन्या (Logistics companies), ट्रेडिंग कंपन्या (Trading companies) तसेच लेबर कॉन्ट्रॅक्टर ऑफिसेस (Labor Contractor's Office) थाटलेली आहेत. केवळ निवडणुकीच्या तोंडावर शहरातल्या तरुणाईला मतदानासाठी आकर्षित करण्यासाठी आयटी पार्कचा बनाव उभा केला होता, असा आरोप त्यांनी केला.

या ठिकाणी आयटी कंपन्याच नसून इथे काम करणार्‍यांचे पगारही बुडवले आहेत. पगारासाठी या तरुणांनी अनेकवेळा जगतापांच्या आयुर्वेद कार्यालयावर खेटा घातल्या. काहींनी तर सरकारी कार्यालयांमध्ये जाऊन देखील पगार मिळतो का यासाठी दारे ठोठावली. मात्र त्यांना दमबाजी करण्यात आली, असेही त्यांनी म्हटले आहे.

या आमने-सामने...!

आयटी पार्क प्रकरणावर जाहीरपणे आमने-सामने येण्याचे आव्हान किरण काळे यांनी आमदारांना दिले आहे. आमच्या प्रश्नांना पुराव्यानिशी जाहीरपणे खरी उत्तरे द्या, असे आव्हान देत काळे यांनी चार दिवसांची मुदतही दिली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com