
अहमदनगर | प्रतिनिधी
आयटी पार्कवरून (Ahmednagar IT Park) स्थानिक काँग्रेस-राष्ट्रवादीतील (Congress vs NCP) वाद विकोपाला गेला आहे. विनयभंगाचा गुन्हा (crime of molestation) दाखल झाल्यानंतर आयटी पार्कमध्ये (IT Park) काय घडले, याची सीडी (CD) पत्रकार परिषदेत (Press conference) दाखवून कर नाही तर डर कशाला, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस (Congress) शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे (Kiran Kale) यांनी आरोपांचा इन्कार केला. आमदार व त्यांच्या समर्थकांच्या दबावातून खोटा गुन्हा दाखल झाला, असा आरोप त्यांनी केला.
काल काळे यांनी आयटी पार्कचा (Ahmednagar IT Park) दौरा करून आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्यावर तरूणांच्या फसवणूकीचा गंभीर आरोप केला होता. या दौर्यावेळी काळे यांनी विनयभंग केला, अशी तक्रार एका महिलेने उशिरा रात्री पोलिसांत दाखल केली. या आरोपांबाबत काळे यांनी पत्रकार परिषदेत आपली बाजू मांडली. काळे म्हणाले, आयटी पार्कमध्ये नोकरी (Job in IT Park) देण्याचा बनाव विधानसभा निवडणुकीच्या (Assembly elections) तोंडावर आमदारांकडून उभा करण्यात आला. काही कंपन्या आणल्या, मात्र काही कंपन्या आमदारांनी आपल्याच कार्यालयात जन्माला घातल्या. हा मतांच्या राजकारणासाठीचा डाव होता. काही तरूणांचे पगार निवडणुकीच्या तोंडावर एक महिन्यासाठी दिले. मात्र नंतर दिले नाहीत. आम्ही त्यांना तक्रार करण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांना दमबाजीची भिती असल्याने तक्रारीचे धाडस या तरूणांनी दाखविले नाही. आयटी पार्कच्या उद्घाटनावेळी ज्या कंपन्या होत्या, त्या आज कोठे आहेत, त्याचा शोध घेतला पाहिजे. त्यातून खरा तो उलगडा होईल.
सरकारी वास्तूत प्रवेश गैर नाही. आयटी पार्कची (IT Park) मालकी आजही एमआयडीसीकडे (MIDC) आहे. त्यामुळे तेथे प्रवेश गैर होत नाही. काल आम्ही तेथे संवाद साधला. संवाद चांगला झाला. तेथे कोणाशी वाद झाला नाही. त्यामुळे कोणाचा हात धरण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे आमच्यावर उडविण्यात आलेले शिंतोडे खेदजनक आहेत. आमच्यावर महिला शौचालयात गेल्याचा आरोप हास्यास्पद आहे. आम्ही पुरूषांच्याही शौचालयात गेलो नाही, तेव्हा महिला शौचालयाचा विषय दूरचा आहे. यासाठी आमच्याकडे उपलब्ध व्हिडिओ फुटेज (Video footage) आम्ही पोलिसांना (Police) देणार आहोत. पोलिसांनी आयटी पार्कचे सीसीटिव्ही फूटेज (CCTV footage) तपासावे.
माता-बघीणींना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याची आमदारांची जुनीच सवय आहे. आयुर्वेद नावाचा आमदारांचा आणि त्यांच्या गुंडांचा अड्डा आहे, तेथून हा प्रकार चालतो. त्या बहिणीवर आमदार व त्यांच्या समर्थकांनी दबाव टाकून खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. आमदार व त्यांच्या समर्थकांनी दबाव आणल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला असावा, त्यामुळे आमची पोलिसांबद्दल आमची तक्रार नाही. आयटी पार्कबाबत आजही आमचे चर्चेचे आव्हान खुले आहे. आमदारांनी आपल्याकडे असलेले पुरावे घेवून आमच्या प्रश्नांना जाहीरपणे उत्तर द्यावे, असे आवाहन त्यांनी पुन्हा दिले. काळे यांनी दाखविलेल्या सीडीमध्ये ते आयटी पार्कमध्ये काम करणार्या युवक-युवतींशी संवाद साधत असल्याचे दिसत आहे.