
अहमदनगर (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. त्रामुळे धरणांत पाण्राची आवक जरी सुरू असली तरी जिल्ह्यात दमदार पावसाची प्रतिक्षा आहे. पावसाअभावी सध्या पेरणी झालेल्या पिकांची स्थिती नाजूक असून पावसाने दडी मारल्याने चाराटंचाई निर्माण होण्राची शक्रता आहे. येत्या आठ दिवस म्हणजे महिनाअखेर पुरेल ऐवढाचा चारा जिल्ह्यात शिल्लक असून दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातून चारा वाहतुकीवर बंदी आणण्यास पशूसंवर्धन विभाग आग्रही आहे. चारा टंचाईबाबत पशूसंवर्धन विभाग येत्या दोन दिवसांत आपला अहवाल जिल्हा प्रशासनाला देण्याच्या तयारीत आहे.
आकाराने मोठ्या असणार्या नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पशूधन आहे. या पशूधनासाठी मोठ्याप्रमाणात चार्यांची गरज असून सध्या पावसाळा लांबल्याने जिल्ह्यातील पशूसंवर्धन विभाग आणि कृषी विभागाच्यावतीने चारा उपलब्ध करण्यावर भर देत आहे. जिल्ह्यात 13 लाख 78 हजार गायी आणि 2 लाख 21 हजार असे एकूण 15 लाख 99 हजार गायी वर्गीय जनावरांची संख्या असून त्यांना महिनाअखेर म्हणजे 31 जुलैपर्यंत पुरेल ऐवढा चारा उपलब्ध आहे. जिल्ह्यात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय वाढला असून शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुध धंद्याकडे पाहिले जात आहे. यामुळे मोठ्या संख्याने पशूधनात वाढ झालेली आहे. दरम्यान, 24 जुलै उजाडेला असून अद्याप पावसाची प्रतिक्षा असल्याने शेतकर्यांना पेरण्यासोबत आता जनावरांच्या चार्यांची चिंता आहे. पाऊस लांबल्याने आता कृषी विभागासोबत आता पशूसंवर्धन विभाग चिंतेत आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील पाथर्डी, कर्जत, जामखेडसह अन्य काही तालुक्यात चार्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान, पशूसंवर्ध विभागाने वैरण विकाससह मूग घास यासह चारा निमिर्ती करण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यात मार्च 2023 अखेर पशूधनासाठी 76 लाख 11 हजार 990 मेट्रीक टन चारा उपलब्ध होता. यापैकी जवळपास आता चारा संपत आला असून यामुळे लवकरच चारा टंचाईच्या स्थितीला समोर जाण्याची वेळ येणार आहे. यामुळे पशूसंवर्धन विभाग जिल्ह्यातील चारा टंचाईबाबत जिल्हा प्रशासन यांच्याशी चर्चा करून आपला अहवाल सादर करणार आहे. दरम्यान, येत्या आठ दिवसात जिल्ह्यात दमदार पाऊस न झाल्यास चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होणार आहे.
जिल्ह्यात महिनाभरात झालेल्या रिमझिम पावसावर काही प्रमाणात गवताची निर्मिती झालेली आहे. मात्र, दुधाळ पशूधनाला सकस चार्यांची गरज असून घास, मका, मूर घास यासह अन्य चारा पिकांसाठी पाण्याची गरज आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील विहीरींनी तळ गाठलेला असून याचा थेट परिणाम चारा पिकांवर होणार आहे. यामुळे चार्यांचे दर गगनाला भिडणार असून शेतकर्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे.
गाळपावर होणार परिणाम
जिल्ह्यात अद्याप चारा म्हणून ऊसाचा वापर सुरू करण्यात आलेला नाही. मात्र, पावसाने हजेरी न लावल्यास शेतकर्यांना चार्यासाठी ऊसाचा आधार घ्यावा लागणार आहे. आधीच पावसाअभावी ऊस पिकाच्या लागवडीचा प्रश्न असून त्यात आता चारा टंचाई काळात ऊसाचा वापर वाढल्यास त्याचा कारखान्यांच्या गाळपावर होण्याची शक्यता नाकारात येत नाही, अशी भिती पशूसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे.