गोवरला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज!

नियमित लसीकरणाचा ही वेग वाढवला : प्राथमिक आरोग्य विभागाकडे मुबलक औषधांचा साठा
गोवरला रोखण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज!

अहमदनगर (प्रतिनिधी)

मुंबईसह राज्यात गोवर आजाराचा फैलाव वाढतांना दिसत आहे. यामुळे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने प्रत्येक जिल्ह्यातील आरोग्य विभागाला गोवरला रोखण्यासाठी सुक्षम नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत.

त्यानूसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग कामाला लागली असून दर महिन्यांला मुलांचे होणारे गोवर प्रतिबंधात्मक लसीकरण वाढवले आहे. दरम्यान, नगर मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण जिल्ह्यातील 10 संशयीत गोवर रुग्णांचे नमुने निगेटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे.

राज्यात मुंबई शहरात आणि उपनगरात गोवर आजाराचा फैलाव वाढतांना दिसत आहे. आधी मुंबईपूर्ता मर्यादित असणार्‍या गोवर आजाराचे रुग्ण हे राज्याच्या विविध जिल्ह्यात दिसत आहे. यामुळे राज्य सरकारचे आरोग्य विभाग सर्तक झाले असून त्यांनी प्रत्येक जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला गोवरला वेळीच रोखण्यासाठी सुक्षम नियोजन करण्याच्या सुचना दिला आहेत. त्यानूसार जिल्हा परिषद आरोग्य विभाग ग्रामीण भागात परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. तसेच संशयीत गोवर रुग्ण समोर आल्यास त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करत त्याच्या रक्ताचे नमुने पुण्याच्या शासकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवत आहे.

नगर जिल्ह्यात अशा प्रकारे नगर शहरातील मनपा हद्दीतील 14 आणि ग्रामीण भागातील 10 असे 24 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. ही सर्व नमुने निगेटीव्ह आली असल्याची माहिती झेडपी आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली. यासह नगर जिल्ह्यात चालू वर्षात 64 हजार 277 जणांना गोवर प्रतिबंधात्मक लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यापैकी ऑक्टोंबर अखेर 58 टक्के लस देण्याचे नियोजन असतांना 38 हजार 385 जणांना गोवर प्रतिबंधात्मक (60 टक्के) लसीकरण झाले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com