नगरकरांनी यंदाही साध्यापद्धतीने साजरा केला गुढीपाडवा

नगरकरांनी यंदाही साध्यापद्धतीने साजरा केला गुढीपाडवा

दुकाने बंद, उलाढाल ठप्प : गुढीपाडवा मुहूर्तालाच ग्राहकांचा हिरमोड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या दुसर्‍या लाटेने धडकी भरली आहे. शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध लादले आहेत.

यामुळे सलग दुसर्‍या वर्षी गुढीपाडवा मुहूर्तावर दुकाने बंद असल्याने नगरच्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. तर दुसरीकडे मागच्या वर्षाप्रमाणे या वर्षी देखील गुढीपाडवा यंदा घरच्या घरी साजरा करावा लागला. करोनाशी लढा देत करोनाचे नियम पाळून नगरकरांनी गुढी उभारली. सोशलमिडीयावरून पाडवा व नववर्षाच्या शुभेच्छा देत काळजी घेण्याचे आव्हान नागरिक करत होते.

करोना रूग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाने निबर्र्ंध जारी केले आहेत. मार्च 2020 मध्ये आलेल्या करोनामुळे मागच्या वर्षी देखील गुढीपाडवा सणावर करोनाचे संकट होते. चालू वर्षी करोनाची दुसरी लाट आली आहे. यामुळे यंदाही गुढीपाडवा साधा पद्धतीने साजरा करावा लागला. सोने- चांदी, वाहन खरेदी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, फर्निचर आदी दुकाने गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर बंद असल्याने व्यावसायिकांना मोठा आर्थिक फटका सोसावा लागणार आहे. खरेदीचे स्वप्न बाळगलेल्या ग्राहकांचा मुहूर्त टळल्याने हिरमोड झाला आहे.

मराठी नववर्षाचा प्रारंभ तर वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून गुढीपाडवा समजला जातो. या दिवसाला विशेष महत्व असल्याने बहुतांश ग्राहक नवीन वस्तू खरेदीसाठी या दिवसाला पसंती देतात. मात्र, यंदा करोनाच्या दुसर्‍या लाटेचे सावड असल्याने सलग दुसर्‍या वर्षी बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. दोन दिवसाचा विकेंड लॉकडाऊन नंतर सोमवार व मंगळवार नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. साध्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करण्यासाठी नागरिकांनी खरेदी करून हा सण करोना सावटाखाली साजरा केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com