ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; कधी मतदान, कधी निकाल?

ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; कधी मतदान, कधी निकाल?

अहमदनगर | Ahmednagar

निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. ५ जून २०२२ रोजी मतदार घेण्यात येणार आहे. ६ जून २०२२ रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; कधी मतदान, कधी निकाल?
अजब लग्नाची गजब गोष्ट! चक्क वयाच्या ६६ व्या वर्षी भारताचे माजी क्रिकेटपटू चढले बोहल्यावर

राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केलेल्या ग्रामपंचायत पोटनिवडणूकांचे सूचना देणारे परिपत्रक अहमदनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी यांना पाठविले आहे. निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार तारीख निहाय निवडणूक कार्यक्रम घेण्यात यावा. अशा सूचना या परिपत्रकांत देण्यात आल्या आहेत.

ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; कधी मतदान, कधी निकाल?
राणादा अन् पाठकबाईचा एकमेकांत जीव रंगला; पहा साखरपुड्याचे खास फोटो

या निवडणूकांसाठी १३ मे २०२२ ते २० मे २०२२ या कालावधीत उमेदवारी अर्ज (नामनिर्देशनपत्र) दाखल करता येईल. अर्जाची छाननी २३ मे २०२२ रोजी करण्‍यात येणार असून २५ मे २०२२ रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. ५ जून २०२२ रोजी मतदान होणार आहे. ६ जून २०२२ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.

ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; कधी मतदान, कधी निकाल?
पांढरी साडी अन् साधा भोळा अंदाज, पाहा 'आर्ची'चे खास फोटो

सर्व जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी निवडणूक आयोगाच्या २९ एप्रिल २०२२ मधील परिपत्रकातील सूचनांचे तंतोतत पालन करून सदर पोटनिवडणूकांचा कार्यक्रम राबवावा. अशा सूचना ही ग्रामपंचायत निवडणूक शाखेने दिल्या आहेत.

Related Stories

No stories found.