डिग्रसची मोहीम फत्ते करणाऱ्या पोलिसांचा गौरव

डिग्रसची मोहीम फत्ते करणाऱ्या पोलिसांचा गौरव

अहमदनगर | प्रतिनिधी | Ahmedagar

राहुरी (Rahuri) तालुक्यातील डिग्रस (Digras) येथील घरात शस्त्रासह शिरलेल्या आरोपीने आपल्याविरूद्ध दाखल केलेला गुन्हा मागे घ्यावा, या मागणीसाठी घरातील मुलीच्या डोक्यावर शस्त्र रोखून तिला ओलीस ठेवले होते.

त्याला जेरबंद करणे हे मोठे आव्हान पोलिसांसमोर (Police) होते. त्यामुळे वरिष्ठ पातळीपर्यंत सूत्रे हलली आणि पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून ऑपरेशन फत्ते केले.

डिग्रज गावात गुरुवारी राबविण्यात आलेले हे कठीण ऑपरेशन नेमके कसे पार पडले, याचा तपशील नाशिक विभागाचे पोलीस उपमहानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील, पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर येथील पत्रकार परिषदेत सांगितला.

यावेळी धाडसी कारवाईबद्दल श्रीरामपूरचे उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे, पोलीस निरीक्षक संजय सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकरसिंग रजपुत, जीवन बोरसे, उपनिरीक्षक तुषार धाकराव, निरज बोकील, सहाय्यक उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे. पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, सुरेश औटी, वाल्मीक पारधी, सोमनाथ जायभाय, संतोष राठोड, पंकज गोसावी, किशोर जाधव, राहुल नरवडे, महेंद्र पवार यांचा उपमहानिरीक्षक शेखर पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक पाटील, अपर अधीक्षक सौरभ अग्रवाल, श्रीरामपूरच्या अपर अधीक्षक दीपाली काळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.