नगरमध्ये उद्यापासून फक्त ज्येष्ठांचा दुसरा डोस

18 ते 44 वयोगटाची लस संपली
नगरमध्ये उद्यापासून फक्त ज्येष्ठांचा दुसरा डोस

अहमदनगर (प्रतिनिधी)- पंधरा दिवसांपासून बंद असलेला ज्येष्ठांचा कोरोना लसीचा दुसरा डोस उद्या मंगळवारपासून सुरू होणार आहे.

महापालिकेच्या सातही केंद्रावर हा डोस दिला जाणार आहे. उद्या कोव्हॅक्सिन तर बुधवारी कोवीशिल्डचा डोस दिला जाणार असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली. मंगळवारी फक्त कोव्हॅक्सिन लस मिळेल, परवा फक्त कोविशिल्ड. 18 ते 44 वयोगटासाठी राज्य शासनाने दिलेले डोस संपले आहेत. त्यामुळे पुढचे डोस येईपर्यंत या वयोगटाचे लसीकरण उद्यापासून नगर शहरात बंद असेल, असे डॉ. बोरगे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com