उड्डाणपुलावरील शिवसृष्टीचे उद्या होणार लोकार्पण

खा. डॉ. विखे || शहराच्या सुरक्षितेसाठी साडे तीन कोटी
उड्डाणपुलावरील शिवसृष्टीचे उद्या होणार लोकार्पण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

शहरातील सुरक्षेच्यादृष्टीने 35 ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे. तसेच पोलीस व तुरूंग विभाग अद्ययावत करण्यासाठी जिल्हा नियोजन मार्फत साडे तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच शहरातील उड्डाणपुलावर चित्ररूपात साकारण्यात आलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण 19 फेब्रुवारी 2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त करण्यात येणार असल्याची माहिती खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली.

उड्डाणपुलावरील शिवसृष्टीचे उद्या होणार लोकार्पण
महानगरपालिका : ‘स्थायी’त भाकरी फिरली

खा.डॉ. विखे पाटील म्हणाले, नागरिकांच्या व शासनाच्या मालमत्तेचे रक्षण आणि शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी संशयास्पद लोक, वाहन, वस्तू इत्यादींवर लक्ष ठेवणे. जिल्ह्यातील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणी यांचे सतत निरीक्षण करणे, नगर येथील कमांड कंट्रोल सेंटरमध्ये नगर शहर, शिर्डी, शनिशिंगणापूर, राहाता हे सर्व ठिकाणे सीसीटीव्हीने नियंत्रणात येणार असल्याचे खा.डॉ.विखे पाटील यांनी सांगितले.

उड्डाणपुलावरील शिवसृष्टीचे उद्या होणार लोकार्पण
शिर्डीतील शेत जमिनीच्या व्यवहारात ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची 1 कोटी 31 लाखांची फसवणूक

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास फुलांची सजावट करण्यात येणार असून, याबरोबरच नगर शहरातील उड्डाणपुलाच्या खांबावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंग रेखटण्यात आलेल्या शिवसृष्टीचे लोकार्पण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उड्डाणपुलावरील शिवसृष्टीचे उद्या होणार लोकार्पण
समिती-संघाच्या अधिवेशनाकडे जिल्ह्यातील गुरूजींची पाठ
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com