अहमदनगर|Ahmedagar

जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्यात आलेला आरोपी परशुराम ऊर्फ परेश चंद्रकांत खराडे (वय- 34 रा. नालेगाव, नगर) हा नगर

शहरात आढळून आल्याने तोफखाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. खराडे विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

27 एप्रिल 2019 रोजी आरोपी परेश खराडे याला जिल्ह्यातून दोन वर्षांकरीता तडीपार करण्याबाबत आदेश पारीत केला आहे. सदर आदेशाचा भंग करून आरोपी खराडे कल्याण रोडवरील भावनाऋषी सोसायटी येथे असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आरोपी खराडे यांना अटक करून त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळुंके, पोलीस नाईक अविनाश वाकचौरे, वसिम पठाण, ज्ञानेश्वर मोरे, अहमद इनामदार, पोलीस शिपाई अतुल कोतकर, सचिन जगताप, धीरज खंडागळे, शिरीष तरटे यांच्या पथकाने ही कारवाई केली.