मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत

१५ कोटींचा आराखडा : टँकरसाठी ११ कोटी ३५ लाखांची तरतूद
मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत

अहमदनगर (प्रतिनिधी)

जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसानंतर ही ३४१ गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने ऑक्टोबर २०२१ ते जून २०२२ या कालावधीसाठी १४ कोटी ६३ लाख रुपयांचा टंचाई कृती आरखडा तयार केला असून त्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे या आराखड्यात पाण्याच्या टँकरसाठी ११ कोटी ३५ तरतूद करण्यात आली आहे.

मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत
भाग्यश्रीच्या मनमोहक अदांची चाहत्यांना पडली भुरळ, पाहा फोटो

दरवर्षी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग हा सप्टेंबर ते जून या कालावधीत जिल्ह्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईचा अंदाज घेवून संभाव्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी कृती आराखडा तयार करत असते आणि त्या आराखड्यात बाबीनिहाय उपाययोजना सुचवून त्यासाठी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून अनुदान उपलब्ध करून ठेवत असते. यंदा देखील जिल्ह्यात मुबलक पावसानंतर ३४१ गावे आणि १ हजार २३१ वाड्या वस्त्यांवर संभाव्य पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात होत आहे. यासाठी जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत.

मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत
विशाल निकम ठरला Bigg Boss Marathi 3 चा विजेता, जाणून त्याच्याविषयी...

या उपाययोजनांमध्ये ५ गावात आणि ८ वाड्या वस्त्यावर १० उपायोजना राबवून विहीर खोल करणे अथवा त्यातील गाळ काढण्यात येणार आहे. ११३ गावे आणि १४९ वाड्यावर २१३ उपाययोजना राबवून खासगी विहरी अधिग्रहरण करण्यात येणार आहे. ३५ गावे आणि ५७ वाड्यावर ६९ उपाययोजना राबवून बैलगाडीव्दारे पाण्याचे टँकर भरण्यात येणार आहेत. १८२ गावे आणि ९९९ वाड्यावर बैलगाडी अथवा वाहनातील पाण्याच्या टँकरव्दारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.

मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत
PHOTO : अंकिता लोखंडेचा मराठमोळा साज; नऊवारीत सौंदर्य दिसतय खुलून

४ तर गावे आणि १० वाड्यांवर १० उपाययोजना राबवित नळ योजनांची विशेष दुरूस्ती करण्यात येणार आहे. तर दोन गावात आणि आठ वाड्यांवर ८ उपाययोजना राबवून तात्पूरत्या पुरक नळ पाणी पुरवठा योजना तयार करण्यात येणार आहे. अशा प्रकारे जिल्ह्यात उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि क्षार युक्त पाणी असणाऱ्या गावातील जनतेची तहान भागविण्यासाठी १४ कोटी ६३ लाख रुपयांचा टंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.

मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत
सोशल मीडियावर सनी लिओनीच्या अटकेची का होतेय मागणी?

जलजीवन मिशनचा फायद होणार

केंद्राच्या वतीने जिल्ह्यात जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील काही गावांची या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आलेली आहे. हा कार्यक्रम पाण्याच्या टँकरची गरज असणाऱ्या गावात प्रामुख्याने राबविण्यात येणार असून यामुळे या कार्यक्रमाचा पाणी टंचाईवर मात करण्यासाठी फायदा होणार आहे.

मुबलक पावसानंतरही ३४१ गावे टंचाईच्या छायेत
Indian Navy Day : छत्रपती शिवाजी महाराजांना 'फादर ऑफ इंडियन नेव्ही' का म्हणतात?
जिल्ह्यात नगर, संगमनेर आणि कर्जत तालुक्यात दरवर्षी दमदार पावसानंतर पाण्याच्या टँकरची गरज भासते. नगर आणि संगमनेर तालुक्यात काही गावे ही क्षार युक्त पाणी असणारे गावे आहेत. तसेच संगमनेरच्या पठार भागात कितीही पाऊस झाला तरी पाणी टंचाई निर्माण होते. यामुळे याभागातील जनतेची तहान भागाविण्यासाठी टँकरची गरज असतेच.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com