महावितरणविरोधात सरपंच परिषदेचा एल्गार

महावितरणविरोधात सरपंच परिषदेचा एल्गार

अहमदनगर (प्रतिनिधी)

स्ट्रिट लाईट (Street light) बंद ठेऊन गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करुन महावितरण (MSEDCL) विरोधात एल्गार मोर्चा (Elgar Morcha) काढण्याचा निर्णय अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेने (Ahmednagar District Sarpanch Parishad) घेतला आहे. ग्रामपंचायतच्या चौदाव्या वित्तआयोगाच्या (Gram Panchayat Fourteenth Finance Commission) रकमेतून स्ट्रिट लाईट(Street light), वीज बिल (Electricity bill), पाणी पुरवठा बील वसुल करण्यास देखिल परिषदेने विरोध दर्शविला आहे.

अहमदनगर जिल्हा सरपंच परिषदेची (Ahmednagar District Sarpanch Parishad) आढावा बैठक नगर तालुका पंचायत समिती (Nagar Panchayat Samiti) येथील स्व. बाळासाहेब ठाकरे सभागृहात (Late. Balasaheb Thackeray hall) पार पडली. सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीप्रसंगी सरपंच परिषदेचे नगर तालुका सचिव पै. नाना डोंगरे, संजय गेरंगे, इसळक सरपंच छाया गेरंगे, दहिगाव सरपंच मधुकर म्हस्के, खडकी सरपंच प्रविण कोठुळे, दशमी गव्हाण सरपंच संगिता कांबळे, बुर्हाणनगर सरपंच रावसाहेब कर्डिले, बुरुडगाव सरपंच अर्चना कुलट, बापूसाहेब कुलट, भोयरे पठार सरपंच बाबा टकले उपस्थित होते.

या बैठकीत ग्रामपंचायतच्या वित्त आयोगाच्या रकमेतून स्ट्रिट लाईट, वीज बिल, पाणी पुरवठा बील वसुल करण्यास या सभेत विरोध करण्यात आला. सदर बील शासन भरत होते. परंतू मागील वर्षी चौदा वित्तआयोगाच्या रकमेतून दोन हप्त्यात स्ट्रिट लाईट बिलाचे हप्ते ग्रामपंचायतकडून वसुल करण्यात आले. त्याची कुठलेही भरणा रकमेचा तपशील व पावती देण्यात आलेली नाही. विद्युत महावितरणाने करोनाची परिस्थिती, पाऊस, अतिवृष्टी, रोगराई या काळात स्ट्रिट लाईट चालू ठेवणे अत्यावश्यक असताना सर्व गावे अंधारात ठेवत असल्याचा आरोप करण्यात आला.

महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमधून (Maharashtra Rural Employment Guarantee Scheme) ग्रामविकास करण्यात येणार्‍या वेगवेगळ्या कामांची, तसेच पंतप्रधान आवास योजनाबाबतही चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात सरपंच परिषदेच्या शाखा सुरु करण्याचा व सरपंच परिषदेचा जिल्हाव्यापी मेळावा घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

महावितरण व मोबाईल टॉवरवर टॅक्स लावण्याचा विचार

महावितरण व वेगवेगळ्या मोबाईल कंपन्याचे टॉवर (Mobile tower) या व्यवसाय करणार्‍या आणि नफा कमविणार्‍या कंपन्या आहेत. यांच्याकडून महसुल व गावठाण हद्दीत असणारे पोल, डिपी, सब स्टेशन (Sub station) तसेच हायटेशन टॉवर व मोबाईल मनोरे (Highting towers and mobile towers), यांचा टॅक्स ग्रामपंचायतीने वसुल करण्यासंदर्भात चर्चा झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com