प्रत्येक अंगणवाडीची कुडंली होणार तयार

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त महिला बालकल्याण विभागाच्या चार योजनांची प्रभावी अंमलबजावणी
प्रत्येक अंगणवाडीची कुडंली होणार तयार

अहमदनगर (प्रतिनिधी)

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त प्रत्येक शासकीय विभाग वेगवेगळे उपक्रम राबवत आहे. यात जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील 5 हजार 634 अंगणवाडीतील भौतिक सुविधा, अंगणवाड्यांचे श्रेणीकरण, कुपोषित बालकांना कुपोषणातून बाहेर काढणे, प्रत्येक अंगणवाडीत बालसंकल्प उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीचा डाटा झेडपीच्या महिला बालकल्याण विभागाकडे जमा होणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या सुचनेनूसार जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीच्या परिसरात शेवगाव शेंगाचे किमान एकतरी झाड लावण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यात किमान 5 हजार 634 शेवगाव शेंगाचे नवीन झाडे तयार होणार आहे. यासह जिल्ह्यातील अ, ब, क, ड, अशी श्रेणी तयार येणार आहे. अंगणवाडीत असणार्‍या भौतिक सुविधा, त्या ठिकाणी देण्यात येणार्‍या सुविधा, राबवण्यात येणारे उपक्रम, अंगणवाडीसाठी स्वतंत्र इमारत, संरक्षण भिंती, बोलक्या भिंती, वॉटर फिल्टर यंत्रणा, वीज सुविधा, खेळाचे साहित्य, नळ जोड आहे? हात धुण्यासाठी बेसीन आहे? यासह अन्य सुविधांची माहिती संकलित करण्यात येणार आहे.

पोषण आहाराच्या स्थितीत बालकांचे नियमिम वजन होते ? प्रौढांचा वजन काटे आहे?, आहार साठवणूक व्यवस्था, पूरक पोषण आहाराचे वाटप होते? आरोग्य तपासणी, नियमित लसीकरण होते? याची माहिती घेण्यात येणार आहे. ही सर्व माहिती संकलित झाल्यावर महिला बालकल्याण विभागाकडे प्रत्येक अंगणवाडीची कुंडलीच तयार होणार असल्याचे जिल्हा महिला बालकल्याण अधिकारी मनोज ससे यांनी सांगितले. तसेच कुपोषीत असणार्‍या सॉम आणि मॅम बालकांसाठी विशेष उपचार आणि पूरक पोषण आहार देवून त्यांना कुपोषणाच्या पातळीतून बाहेर काढण्यात येणार आहे. या बालकांची श्रेणी सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.

अंगणवाडीची अशी ठरविणार श्रेणी

91 ते 100 गुण मिळविणारे अ श्रेणी, 81 ते 90 गुण मिळविणारे ब श्रेणी, 71 ते 80 गुण मिळवणारे क श्रेणी आणि 70 पेक्षा कमी गुण मिळवणार्‍या अंगणवाड्या या ड श्रेणीत मोडणार आहेत. जिल्ह्याचा डेटा तयार झालेल्या वर खाल्याच्या श्रेणीतून वरच्या श्रेणीत जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडीत किमान अंतर-बाह्य रंगरंगोटी करून अंगणवाडीच्या भिंती बोलक्या करण्यात येणार आहेत. यासह अंगणवाडीचा परिसर स्वच्छ आणि आकर्षक करण्यावर भर देण्यात येणार आहे. देशाच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने महिला बालकल्याण विभाग ही मोहिम राबवत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com