डॉ. तनपुरे कारखाना भाडे तत्त्वावर की विक्री!

जिल्हा बँकेने व्हॅल्युएशनसाठी मागवल्या निविदा
डॉ. तनपुरे कारखाना भाडे तत्त्वावर की विक्री!

अहमदनगर (प्रतिनिधी)

110 कोटीच्या कर्जाखाली दबलेल्या राहुरीच्या डॉ. बाबूराव तनपुरे कारखान्यांच्या मालमत्तेची व्हॅल्युएशन व ड्युडिलिजन्स करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने व्हॅल्युअर नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी निविदा मागवण्यात आली असून कारखान्यांची मालमत्तेची व्हॅल्यु (किंमत) निश्‍चित झाल्यावर एकतर कारखाना भाडे तत्त्वावर चालविण्यासाठी देता येईल, अन्यथा कारखान्यांची विक्री करण्याचा विचार डॉ. तनपुरे कारखान्यासाठी नियुक्त केलेल्या प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक प्रशासन व ऑडीट विभाग यांचा आहे.

गेल्या काही वर्षापासून डॉ. तनपुरे साखर कारखान्यांवर जिल्हा बँकेचे कर्ज आहे. कारखान्यांसाठी घेतलेल्या कर्जाचा आकडा दरवर्षी फुगफूगत आता 110 कोटींच्या पुढे गेला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी हा कारखाना चालवला. तसेच हंगामासाठी जिल्हा बँकेकडून घेतलेल्या कर्जाची काही प्रमाणात परत फेडही केली. यंदा कारखाना सुरू करण्याची शक्यता धूसर होतांना दिसत आहे. कारखाना व्यवस्थापन जिल्हा बँकेला 100 रुपये प्रती टन गाळपावर कर्जाची वसूली देण्यास तयार आहे. मात्र, जिल्हा बँक व्यवस्थापनाकडून 500 रुपये प्रती टन गाळपानूसार वसूली देण्याची मागणी करण्यात येत आहे.

अशा परिस्थिती कारखाना सुरू न झाल्यास थकित कर्जाच्या वसूलीसाठी आता जिल्हा बँक आणि प्राधिकृत अधिकारी तथा सरव्यवस्थापक प्रशासन व ऑडीट विभाग यांनी कारखान्यांची किंमत ठरवण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी व्हॅल्यएर नेमण्यासाठी निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारखान्यांच्या चल व अचल मालमत्तेचे व्हॅल्युएशन व ड्युडिलिजन्स करण्यासाठी निविदा व्हॅल्यएर यांच्याकडून निविदा मागवण्यात येत आहे. ही प्रक्रिया सेक्युरिटायझेशन अ‍ॅण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शिअल असेट्स अ‍ॅण्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सरफेसी) अ‍ॅक्ट 2002 बँकेकडून राबवण्यात येत आहे.

कारखान्यांची किंमत निश्‍चित झाल्यावर एकतर कारखाना आणि त्याची मालमत्ता भाडेतत्त्वावर देता येणार आहे. अथवा तिची विक्री करून जिल्हा बँकेला दिलेल्या कर्जाची वसूली करता येणार आहे. यामुळे गव्हन्मेंट व्हॅल्युअर त्यांनी फर्मच्या निविदा 17 ऑक्टोबरपर्यंत बँकेच्या नगरच्या मुख्य शाखेत पाठवण्याचे आवाहन बँकेच्यावतीने करण्यात आले आहे.

एकेकाळी जिल्ह्यात नव्हे, तर राज्याच्या सहकारात राहुरी कारखाना हे मोठे वैभव होते. अनेक राजकीय स्थित्यांतर या कारखान्याने अनुभवलेले आहे. राहुरी तालुक्यासह जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना कारखान्यांच्या माध्यमातून या कारखान्यांने आर्थिक सक्षम केलेले आहे. मात्र, राहुरी वैभव असणारा डॉ. तनपुरे कारखाना आता शेवटीची घटीका मोजत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com