आनंदाची उधळण; जनमानसात संचारली 'दिवाळी'

आनंदाची उधळण; जनमानसात संचारली 'दिवाळी'

अहमदनगर | प्रतिनिधी

करोनाचे (covid19) संकट, आरोग्याची भिती, आर्थिक चणचण, लॉकडाऊनमुळे (lockdown) घरकोंडी अशा स्थितीत दीड वर्षे घालव्रल्यानंतर यंदाच्या दिवाळीने (diwali) पुन्हा एकदा जनमानसात आनंदाच्या उधळणीचा क्षण आणला आहे. आहे त्या स्थितीत आनंद साजरा करण्याची मानवाची मनिषा पुन्हा एकदा ओसंडून वाहत असून घर आणि बाजार अशा दोन्ही ठिकाणी त्याचे प्रतिबिंब उमटले आहे.

दीड वर्षे देशावर करोनाचे सावट होते. अद्यापही या संकटातून पूर्णपणे सावरता आलेले नाही. मात्र दिवाळीने या संकटावर मात करण्यासाठी बळ मात्र दिले आहे. या आनंदक्षणांमध्ये नागरिक करोनाच्या संटकाला विसरले असून मानसिक उभारीसाठी हा सण आधार ठरला आहे. बाजारात दोन दिवसांपासून खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून येत आहे. कपडे, दागिने, फराळ, फटाके यांची खरेदी सुरू आहे.

तर मुहूर्तावर वाहन खरेदीसाठी अनेकांनी आधीच बुकींग केली आहे. घरे खरेदीतील प्रमाण कमी असले तरी पुढील चित्र आशादायी असल्याचे संकेत वातावरणाने दिले आहेत. व्यापार-उद्योग ठप्प असल्याने अनेक कंपन्यांच्या बोनसवर मर्यादा आल्या. रोजगार आणि व्यवसायातील तुटीचा परिणाम हाती असलेल्या पैशावरही झाला. या स्थितीतही आपल्या आर्थिक स्थितीनुसार दिवाळी साजरी केली जात आहे.

खरेदीचा उत्साह

बुधवार सायंकाळ व गुरूवारी बाजारात खरेदीचा उत्साह अधिक असेल, असा अंदाज व्यावसायिकांनी व्यक्त केला. लक्ष्मीपूजनानिमित्त गुरुवारी सोने खरेदीचा उत्साह वाढलेला दिसेल. गेल्या दोन दिवसात वेतन, बोनस आणि अग्रिमाच्या रकमा नोकरदारांच्या हाती आल्याने खरेदीचा उत्साह वाढणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com