चकली, चिवडा तयारच निवडा!

अनेकांकडून फराळासाठी आऊटसोर्सिंग
चकली, चिवडा तयारच निवडा!

अहमदनगर | प्रतिनिधी

दिवाळी (diwali) सणाचा महत्त्वपूर्ण भाग असलेला फराळ यंदा महागला असला तरी खरेदी व तयार करून घेण्याकडे अनेकांचा कल आहे. त्यामुळे आचाऱ्यांना गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगल्या ऑर्डर्स मिळाल्या आहेत.

फराळाचे पदार्थ घरी बनविण्यात अनेक अडचणी येतात. लहान मुले, घरातील कामे यामुळे वेळ नसल्याने हे पदार्थ बनवून घेणे सोयीस्कर जाते. रूचकर पदार्थ बनविण्यात हातखंडा असलेल्या आचाऱ्यांकडून या वर्षी फराळाचे पदार्थ तयार करून घेतले.

पूर्वी दिवाळी म्हटली की फराळाचे पदार्थ बनविण्यासाठी आठ दिवसांपासून घरात लगबग असायची. मात्र, बदलत्या स्थितीनुसार वेळेअभावी अनेकजण फराळाचे हे पदार्थ आचाऱ्यांना घरी बोलावून तयार करून घेऊ लागले आहेत. अनेक महिला नोकरी-व्यवसायात गुंतल्या असल्याने तसेच पदार्थ बनविण्यात जाणारा वेळ वाचविण्यासाठी फराळ रेडीमेड खरेदी करण्याकडेही अनेकांचा कल आहे.

तिखट पदार्थांबरोबरच गोड पदार्थानाही चांगली मागणी आहे. फराळात साधारणपणे शेव, चकली, चिवडा, करंजी, लाडू, शंकरपाळे, बर्फी, अनारसे या पदार्थांचा समावेश होतो. एवढे पदार्थ घरी करणे अनेकांना केवळ अशक्य असते. मात्र, काहीजण अजूनही सर्व पदार्थ घरीच तयार करणे पसंत करतात. आप्त मंडळींना भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंग केलेला फराळ बाजारात विक्रीस आहे.

वाढत्या महागाईमुळे पदार्थांच्या किमतीत किलोमागे सुमारे २० टक्क्यांनी वाढले आहेत. तरीही या पदार्थांना चांगली मागणी आहे. अनेक गृहिणी पदार्थ रेडिमेड न आणता वस्तू पुरवून ते तयार करून घेतात. पदार्थ बनविण्याची मजुरी साधारणपणे १५० रुपये आहे. अनेकांच्या घरी दिवाळीच्या सुट्टीत पाहुणे येत असल्याने, तसेच परगावी, परराज्यात व परदेशात पाठविण्यासाठी फराळ मोठ्या प्रमाणात लागतो. रूचकर पदार्थ बनवून देत असल्याने ग्राहकांचा ओढा पदार्थ तयार बनवून घेण्याकडे असतो, असा अनुभव गेल्या अनेक वर्षांपासून फराळाचे पदार्थ बनविणारे व्यावसायिक बापूमहाराज गटकळ यांनी सांगितला.

फराळाचे पदार्थ घरी बनविण्यात अनेक अडचणी येतात. लहान मुले, घरातील कामे यामुळे वेळ नसल्याने हे पदार्थ बनवून घेणे सोयीस्कर जाते. रूचकर पदार्थ बनविण्यात हातखंडा असलेल्या आचाऱ्यांकडून या वर्षी फराळाचे पदार्थ तयार करून घेतले.

- रिना क्षेत्रे, गृहिणी

गेल्या वर्षी करोनाच्या संकटामुळे फराळाचे पदार्थ लोकांनी अल्प प्रमाणात बनविले. गॅस, तेल याबरोबरच किराणा मालाचे दर वाढले असले तरी या वर्षी तुलनेत तयार फराळाला चांगली मागणी आहे. वेळेचा अभाव व दर्जेदार पदार्थासाठी अनेकांचा कल फराळ बनवून घेण्याकडे असतो. २० वर्षांपासून चांगली सेवा देत असल्याने पारंपारिक ग्राहक टिकून आहेत.

बापूमहाराज गटकळ, संचालक, अक्षय केटर्स, पाईपलाईन रोड

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com