आज पुन्हा यलो अलर्ट

सोमवारी रात्री पावसाने जिल्ह्याला झोडपले
आज पुन्हा यलो अलर्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील पाऊस थांबण्याचे नाव घेण्यास तयार नाही. भारतीय हवामान खात्याने आज बुधवारी (दि.19) जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, सोमवारी रात्री उशीरा नगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागाला ढगाच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह झोडपून काढले. यामुळे खरीप हंगामात आलेल्या पिकांचे आणखी नुकसान झाले आहे.

जिल्ह्यात जूनपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. खरीप हंगामातील काढणीला आलेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून कृषी विभागाकडून त्यांचे पंचनामे करण्यात आले असून दोन दिवसांत नुकसानीची अंतिम आकडेवारी समोर येणार आहे. त्यानंतर ती शासनाला सादर करून भरपाईची मागणी करण्यात येणार आहे.

दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 550 मिली मीटरच्या जवळपास सरासरीच्या 128 टक्के पाऊस झालेला आहे. सोमवारी रात्री जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला असून अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. जिल्ह्यात असणार्‍या 97 महसूल मंडलांपैकी 56 महसूल मंडलात मुसळधार पाऊस झाला. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुन्हा आज जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com