नागवडे व भगत यांच्याकडे महिला काँग्रेसचे नेतृत्व

नागवडे व भगत यांच्याकडे महिला काँग्रेसचे नेतृत्व

अहमदनगर (प्रतिनिधी)

अहमदनगर जिल्हा महिला काँग्रेसच्या (Ahmednagar District Women Congress) अध्यक्षपदी अनुराधाताई नागवडे (Anuradhatai Nagwade) तर नगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी उषाताई भगत (Ushatai Bhagat) यांची निवड करण्यात आली आहे.

अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या मान्यतेने महाराष्ट्राच्या प्रभारी तथा राष्ट्रीय महासचिव आ. ममता भूपेश यांनी नियुक्ती जाहीर केली, अशी माहिती महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष संध्याताई सव्वालाखे यांनी दिली आहे.

अनुराधा नागवडे या विद्यमान जिल्हा परिषद सदस्या आहेत. जिल्हा परिषदेत त्यांनी महिला बाल कल्याण समितीचे सभापतीपदही त्यांनी भूषविले आहे. पक्षात सक्रीय असलेल्या नागवडे यांच्यावर जबाबदारी टाकून पक्षाने जिल्ह्यातील महिला संघटन अधिक बळकट करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.

तर भगत या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, राजकीय चळवळीमध्ये कार्यरत आहेत. महिला बचत गटाच्या चळवळीच्या माध्यमातून त्यांनी अनेक महिलांना शहरामध्ये सक्षम करण्याचे काम केले आहे. पारनेर विधानसभा मतदार संघाचे दिवंगत आ.बाळासाहेब भगत यांच्या त्या सून आहेत. त्यांचे सासरे भगत हे पारनेर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन देखील राहिलेले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com