भर पावसाळ्यात 24 हजार लोकांच्या घशाला कोरड

जिल्ह्यात 11 सरकारी टँकरव्दारे पाणी पुरवठा
भर पावसाळ्यात 24 हजार लोकांच्या घशाला कोरड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (Ahmednagar District) भर पावसाळ्यात 14 गावे आणि 38 वाड्या-वस्त्यांवर 11 सरकारी टँकरव्दारे (Government Tanker) 24 हजार 223 लोकांना पाणी पुरवठा (Water supply) करण्यात येत आहे. नगर (Nagar), संगमनेर (Sangamner) आणि पारनेर (Parner) या तालुक्यात हे पाण्याचे टँकर (Water Tanker) सुरू असून यावरून जिल्ह्यातील पावसाची सर्वदूर स्थिती फारशी समाधानकारक नसल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात सुरूवातीच्या टप्प्यात दमदार पावसानंतर (Rain) जुलै महिन्यांत मोठा खंड पडला होता. यामुळे खरीप हंगामात (Kharif Season) जवळपास 136 टक्के पेरणी (Sowing) झालेल्या पिके धोक्यात (Crops endangered) आली होती. मात्र, मागील पाच ते सहा दिवसात श्रावणी सरींच्या रिमझिममुळे खरीपांच्या पिकांना जीवदान (Life saving to kharif crops) मिळाले असले तरी अनेक भागात अद्याप मोठा पाऊस झालेला नाही. यात नगर (Nagar) तालुक्यात पाच, तर संगमनेर (Sangamner) आणि पारनेर (Parner) तालुक्यात प्रत्येकी 3 असे 11 सरकारी टँकरव्दारे (Government Water Tanker) 24 हजार 223 जनतेला पाणी पुरवठा (Water supply) करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com