
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
जिल्ह्यात यंदा विक्रमी पावसाची नोंद झाली असली, तरी मार्च 2023 नंतर काही गावांमध्ये पाणी टंचाई जाणवण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने संभाव्य टंचाई लक्षात घेवून चालू वर्षीचा टंचाई कृती आराखडा तयार करून त्याला जिल्हाधिकारी यांची मान्यता घेतलेली आहे.
पाणी पुरवठा विभागाच्या अंदाजानूसार जिल्ह्यात मार्चनंतर 321 गावे आणि 1 हजार 39 वाड्या वस्त्यांवर पाणी टंचाई निर्माण होवू शकते. यासाठी 7 कोटी 37 लाखांची तरतूद करण्यात आली असून यात 9 प्रकारातील उपाय योजना सुचवण्यात आलेल्या आहेत.
दरवर्षी ऑक्टोबर ते जून या कालावधीत पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हावून नयेत, यासाठी पाणी पुरवठा विभागाकडून टंचाई कृती आराखडा तयार करण्यात येतो. यंदा मुबलक पावसानंतरही जिल्ह्यात काही गावात उन्हाळ्यात टंचाईची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यामुळे ऐनवेळी धावपळ नको, यासाठी पाणी पुरवठा विभाग संभाव्य परिस्थिती गृहीत धरून टंचाई कृती आरखडा तयार करून ठेवते. त्यानूसार यंदा 7 कोटी 37 लाखांच्या आराखडा तयार करण्यात आला आहे.
या आराखड्यात बुडक्या खोदणे, विहीर खोल करणे, गाळ काढणे, खासगी विहीर अधिग्रहण करणे, पाण्याचे टँकर भरण्यासाठी उद्भव निश्चित करून ठेवणे, टँकर अथवा बैलगाडीव्दारे पाणी पुरवठा करणे, प्रगतीपथावरील योजना तातडीने पूर्ण करणे, नळ योजनांची विशेष दुरूस्ती करणे, विंधन विहीरींची विशेष दुरूस्ती करणे, नवीन विंधन विहीरी घेणे, तात्पूर्त्या पुरक नळ योजना घेणे यांचा समावेश आहे.
अशा आहेत संभाव्य उपाययोजना
- 115 गावे आणि 75 वाड्यांवर खासगी विहिरी अधिग्रहण करणे : 81 लाख 45हजार.
- 19 गावे 1 वाड्यावस्त्यांसाठी टँकर भरण्यासाठी खासगी विहिरी अधिग्रहीत करणे : 21 लाख 23 हजार
- 186 गावे 962 वाड्यावस्त्यांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे : 6 लाख 32 हजार.
- 1 गावे 1 वाड्यावस्त्यांसाठी नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे : 2 लाख.