नगर जिल्ह्याला 25 हजार लस

नगर जिल्ह्याला 25 हजार लस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

केंद्र सरकारने राज्याला करोना लसचा साठा उपलब्ध करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाची यंत्रणा मंगळवारी सायंकाळी पुण्याला करोना लसीचे डोस घेण्यासाठी रवाना झाली आहे.

गेल्या 28 मार्चला जिल्ह्यात करोनाचे 19 हजार डोस आले होते. त्यानंतर लसीचे डोस न मिळाल्याने जवळपास जिल्ह्यात सर्वत्र करोना लसीकरण ठप्प होते. मात्र, मंगळवारी रात्री उशीरा अथवा आज पहाटे जिल्ह्यासाठी करोनाचे 25 हजार डोस मिळणार असल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आज आलेल्या डोसचे वाटप झाल्यानंतर गुरूवारपासून 45 वर्षावरील करोना लसीकरणाला सुरूवात होण्याची आशा आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com