11 दिवसांत 4 लाख 61 हजार जणांचे लसीकरण

एका दिवसात 85 हजार जणांना डोस
11 दिवसांत 4 लाख 61 हजार जणांचे लसीकरण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर जिल्ह्याने लसीकरणात ( Ahmednagar District Vaccination) आघाडी घेतली असून गेल्या 11 दिवसांत 4 लाख 61 हजार जणांना लस (vaccine) देण्यात आली. जिल्ह्यात 39 टक्क्यांपेक्षा अधिक लोकांना पहिला (First Dose), तर 25 टक्के लोकांना दुसरा डोस (Second Dose) देण्यात आला असून एकूण लसीकरणाने 22 लाखांचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यातील लसीकरणाचे एकूण उद्दिष्ट 38 लाख 87 हजार असून आतापर्यंत जवळपास 60 टक्के लसीकरण (Vaccination) झाले आहे.

नगर जिल्ह्यात (Ahmednagar District) 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेस प्रारंभ (Start vaccination campaigns) झाला. प्रारंभी लसीकरणाचा वेग कमी होता. हळूहळू हा वेग वाढवण्यात आला. आता 18 वर्षांपुढील सर्वांचेच लसीकरण (Vaccinatin) करण्यात येत आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होत आहे. 1 सप्टेंबर 56 हजार 729, 2 सप्टेंबर 29 हजार 499, 3 सप्टेंबर 9 हजार 719, 4 सप्टेंबर 64 हजार 631, 5 सप्टेंबर 6 हजार 254, 6 सप्टेंबर 9 हजार 846, 7 सप्टेंबर रोजी 59 हजार 41, 8 सप्टेंबर रोजी विक्रमी 90 हजार 588, तर 9 सप्टेंबर रोजी 43 हजार 856, 10 सप्टेंबर 6 हजार 400 आणि 11 सप्टेंबर 85 हजार असे 11 दिवसांत एकूण 4 लाख 61 हजार 182 डोस देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Dr. Rajendra Bhosale), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (Zilla Parishad CEO Rajendra Kshirsagar), जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे (District Health Officer Dr. Sandeep Sangale) यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरणाचे उत्तम नियोजन सुरू आहे. जेवढे लसीकरण रोज संपेल, त्यापेक्षा जास्त लस दुसर्‍या दिवशी त्या केंद्रांना मिळत आहे. सध्या मुबलक लस उपलब्ध होत आहे. जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालये, महानगरपालिकेची केंद्रे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत गावागावांत लसीकरणाची शिबिरे आयोजित करून मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू आहे.

38 लाख 87 हजार उद्दिष्ट

नगर जिल्ह्यात 38 लाख 87 हजार 764 जणांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी आतापर्यंत 16 लाख 7 हजार जणांना पहिला डोस (39 टक्के), तर 5 लाख 50 हजार 782 जणांना दुसरा डोस (15 टक्के) देण्यात आला आहे. असे एकूण 21 लाख 78 हजार 214 डोस आतापर्यंत संपले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com