नगर जिल्ह्यासाठी सुमारे 47 कोटींची मदत

मार्च, एप्रिल महिन्यात अवेळी पावसाने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी || 47583 शेतकर्‍यांना होणार लाभ
नगर जिल्ह्यासाठी सुमारे 47 कोटींची मदत

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मार्च आणि एप्रिल 2023 या कालावधीत राज्यातील विविध जिल्ह्यात अवेळी पावसाने झालेल्या नुकसान भरपाईसाठी राज्य शासनाकडून दोनशे बावीस कोटी पासष्ट लाख, चौतीस हजार रूपयांचा निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहेत नगर जिल्ह्यातील 47 हजार 553 नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना 46 कोटी 93 लाख 8 हजार रूपयांच्या मदतीचा समावेश आहे.

तसेच 2012 -2022 या कालावधीत गारपिट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानी पोटी बाधितांना 17 कोटी 96 लाख असे 64 कोटी रुपयांचा नुकसान भरपाईची रक्कम राज्य सरकारने मंजूर केली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

या नुकसान भरपाईचा शासन निर्णय 5 जून 2023 रोजी महसूल आणि वन विभागाच्या संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. यात जिल्ह्यात 2012-2022 या कालावधीत गारपिट व अवेळी पावसामुळे शेतीपिकाचे व बहुवार्षिक पिकांचे नुकसान व मालमत्तेच्या नुकसानीत 15 हजार 351 बाधितांचे नैसर्गिक आपत्तीमध्ये पुर्णत: घर, सोबत कपडे, तसेच घरगुती भांडी, वस्तू यांच्या नुकसान झाले होते. याच्या भरपाईपोटी पोटी 17 कोटी 96 लाखांचा निधीला मंजूर करण्यात आली आहे.

यासह जिल्ह्यात मार्च आणि एप्रिल महिन्यांत 2023 मध्ये श्रीरामपूर तालुका वगळता उर्वरित जिल्ह्यातील 13 तालुक्यांत अवकाळी पावसापोटी 45 हजार 563 शेतकर्‍यांचे 2 लाख 70 हजार 78 हेक्टवरील शेती पिकांचे नुकसान झाले होते. यापोटी 46 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर करून तो वर्ग करण्यात आला आला आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना 64 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असला असल्याचे यासह जिल्हा प्रशासनाच्या सुत्रांकडून सांगण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com