नगर जिल्ह्यात 20 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण

राज्यात 162 लाख मेट्रिक टन
नगर जिल्ह्यात 20 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण
साखर कारखाना

नेवासा |सुखदेव फुलारी| Newasa

यंदाचे सध्या सुरू असलेल्या गळीत हंगामात राज्यातील एकूण 151 साखर कारखान्यांनी 23 नोव्हेंबर 2021 अखेर 162.06 लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून 145.18 लाख क्विंटल साखर उत्पादित केली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा 8.96 टक्के आहे. नगर जिल्ह्यातील 18 कारखान्यांकडून 19 लाख 58 हजार 821 मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे.

दि. 23 नोव्हेंबर 2021 अखेर राज्यातील 74 सहकारी व 77 खाजगी अशा एकूण 151 साखर कारखान्यांचे विभाग निहाय झालेले ऊस गाळप, साखर उत्पादन,साखर उतारा खालील प्रमाणे -

विभाग- ऊस गाळप लाख मे. टन साखर उत्पादन लाख क्विंटल साखर उतारा टक्के

कोल्हापूर विभाग - 44.90 45.39 10.11

पुणे विभाग- 38.26 35.59 9.30

सोलापूर विभाग 35.77 29.47 8.24

अ.नगर विभाग - 20.99 17.35 8.27

औरंगाबाद विभाग - 8.83 6.82 7.72

नांदेड विभाग - 12.00 9.58 7.98

अमरावती विभाग - 1.28 0.98 7.54

नागपूर विभाग- 00.03 00.00 00.00

-----------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण 162.06 145.18 8.96

------------------------------------------------------------------------------------------------------------

नगर जिल्ह्यातील 18 कारखान्यांकडून 20 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण...


नगर जिल्ह्यातील 13 सहकारी व 5 खाजगी अशा एकूण 18 साखर कारखान्यांनी 23 नोव्हेंबर 2021 2021 अखेर 19 लाख 58 हजार 821 मेट्रिक टन उसाचे गाळप करून 16 लाख 20 हजार 845 क्विंटल साखर निर्मिती केली आहे.जिल्ह्याचा सरासरी साखर उतारा 08.30 टक्के आहे.नगर जिल्ह्यातील एकूण 19 लाख 58 हजार 821 मेट्रिक टन ऊसा पैकी 13 सहकारी साखर कारखान्यांनी 13 लाख 31 हजार 903 मेट्रिक टन तर 5 खाजगी साखर कारखान्यांनी 5 लाख 26 हजार 40 मेट्रिक टन ऊसाचे गाळप पूर्ण केलेले आहे.

नगर जिलाह्यातील 18 साखर कारखान्यानी 23 नोव्हेंबर 2021 अखेर केलेले ऊस गाळप,साखर उत्पादन व सरासरी साखर उतारा पुढील प्रमाणे--

अ.नं. कारखाना ऊस गाळप मे. टन साखर उत्पादन क्विंटल सरासरी उतारा टक्के

1) ज्ञानेश्वर 194740 156450 8.0

2) मुळा 141050 97550 6.9

3) संजीवनी 110327 91700 8.3

4) कोपरगाव 106131 90400 8.5

5) गणेश 37100 25075 6.8

6) अशोक 89340 83850 9.4

7) प्रवरा 46100 30875 6.7

8) श्रीगोंदा 139390 130575 9.4

9) संगमनेर 186870 158470 8.5

10) वृद्धेश्वर 52260 39400 7.5

11) अगस्ती 72535 64860 8.9

12) केदारेश्वर 52810 39550 7.5

13) कुकडी 103250 86050 8.3

14) अंबालिका 324075 277550 8.6

15) गंगामाई 139880 108050 7.7

16) साईकृपा,देवदैठण 51928 49650 9.6

17) प्रसाद शुगर 58600 48700 8.3

18) जय श्रीराम 52435 42090 8.0

------------------------------------------------------------------------------------------------------

एकूण 1958821 1620845 8.3

------------------------------------------------------------------------------------------------------------

यंदाचा ऊस गळीत हंगाम 15 ऑक्टोबर पासून सुरू झालेले आहेत. नगर जिल्ह्यातील 23 पैकी 18 साखर कारखान्याचे हंगाम सुरू आहेत.नेवासा तालुक्यातील भेंडा येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याने 1 लाख 94 हजार 740 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून नगर जिल्ह्यातील सहकारी साखर कारखान्यामध्ये तर अंबालिका या खाजगी साखर कारखान्याने 3 लाख 24 हजार 75 मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून जिल्ह्यात आघाडी घेतलेली आहे.

राज्यात 195 साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी परवानगी मागितली असून, त्यापैकी 151 कारखाने सुरू झाले आहेत. उर्वरित कारखान्यांकडून उसाचा रास्त व किफायतशीर दर (एफआरपी) देण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याने त्यांचे परवाने प्रलंबित ठेवण्यात आले आहेत.

यंदा गाळप हंगाम दसऱ्याच्या मुहूर्तावर सुरू करण्यात आला. गाळप हंगामासाठी राज्यातील 195 कारखान्यांनी परवानगी मागितली. मात्र ज्या कारखान्यांनी शेतकऱ्यांची 100 टक्के एफआरपी दिलेली नाही, अशा कारखान्यांना गाळप परवाने देण्यात येऊ नये, असे स्पष्ट आदेश साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिलेले आहेत.

गाळप हंगाम सुरू केलेल्या कारखान्यांपैकी सोलापूर विभागात सर्वाधिक 35 कारखान्यांचा समावेश असून दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूर विभागात 31 कारखाने,पुणे विभागात 26 कारखाने,नगर विभागात 18 कारखाने नांदेड विभागात 22 ,अमरावती विभागात 2 कारखाने तर नागपूर विभागातील एका कारखान्यांचा समावेश आहे.

या हंगामात राज्यात 1093 लाख टन ऊस गाळप अपेक्षित असून 110 लाख टनांपर्यंत साखर उत्पादन होण्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com