शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक विभागाकडून कार्यवाही सुरू

गटशिक्षणाधिकार्‍यांना पत्र सरपंच यांच्या ठरावानुसार परवानगी देणार
शाळा सुरू करण्यासाठी माध्यमिक विभागाकडून कार्यवाही सुरू
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात (Ahmednagar District) करोनाची दुसरी लाट (Covid 19 second wave) ओसरत असून यामुळे राज्य सरकारने (State Government) आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्यास मान्यता दिली (Approval to start classes from 8th to 12th)आहे. मात्र, त्यासाठी सरपंच यांच्या अध्यक्षतेखालील समिती पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा ठराव करणार आहेत. त्यासाठी माध्यमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली आहे. (Proceedings initiated by the Department of Secondary Education)

जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (ZP CEO) यांच्या सहीने गटशिक्षणाधिकारी (Group Education Officer) यांना पत्र पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर गट शिक्षणाधिकारी सरपंच (Sarpanch) यांच्या अध्यक्षतेखाली असणार्‍या संबंधित गावातील पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याचा ठराव करणार आहे. हा ठराव करण्यापूर्वी संबंधीत गाव हे महिनाभर करोनामुक्त झालेले पाहिजे. दरम्यान जिल्ह्यात आठवी ते बारावीपर्यंत दोन हजारांच्या जवळपास शाळा असून या सर्व ठिकाणी सुरूवातीच्या टप्प्यात शाळा सुरू होणे शक्य होणार नाही. यामुळे पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात निवडक ठिकाणी शाळा सुरू (Schools started at selected places in the district) होण्याचा अंदाज शिक्षण विभागाचा आहे.

राज्य सरकारने आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात शाळा सुरू होण्यास बराच वेळ लागणार आहे. प्रत्येक गावात सरपंचाच्या नवीन करोना समितीची पालकांसोबत बैठक होऊन त्यानंतर ठराव होऊन ते सर्व ठराव जिल्हास्तरावर येणार असून त्यानंतर जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, आरोग्य यंत्रणा यांच्याशी चर्चा होऊन त्यानंतर शाळा सुरू होणार आहेत. यात बराच कालावधी जाण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com