
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रमजान ईद व अक्षयतृतीया या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार 1 ते 5 मे या कालावधीत नगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.
नगर शहर व जिल्ह्यात 3 मे रमजान ईद व अक्षयतृतीया हे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. या उत्सवाच्या दरम्यान गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे सध्या जिल्हयात यात्रा उत्सव तसेच धार्मिक कार्यक्रम साजरे होतात त्यावेळी मोठया प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वरील पार्श्वभूमीवर जिल्हयात कोणत्याही किरकोळ घटना वरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलीसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात 1 मे ते 5 मे 2022 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.