जिल्ह्यात 28 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

जिल्ह्यात 28 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण नगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 28 डिसेंबर, 2022 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास शस्त्रे बाळगणे, स्फोटक पदार्थ जवळ बाळगणे, व्यक्तीचे अथवा मृतदेहांचे किंवा त्यांच्या आकृत्या किंवा प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे. ज्यामुळे सभ्यता अगर नीतिमत्ता यास धक्का पोहचेल व सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये मानहानी करण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी कृती व आवेशपूर्ण भाषणे करणे, अंगविक्षेप करणे, किंवा विडंबन करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शासकीय सेवेतील व्यक्तींना ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्य पूर्तीसाठी हत्यार जवळ बाळगणे आवश्यक आहे, तसेच ज्या व्यक्तींना शारिरीक दुर्बलतेच्या कारणास्तव काठी वापरणे आवश्यक आहे, अशा व्यक्तींना सदरचा वापर अनुज्ञेय राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com