सहा दिवस जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचे प्रशासनाचे आवाहन
सहा दिवस जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

होळी, धुलीवंदन, शिवजयंती व रंगपंचमी या सणांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे तसेच करोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 ( 1 ) ( 3 ) अन्वये जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या आदेशानुसार 17 ते 22 मार्च, या कालावधीत अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत.

17 मार्च रोजी होळी, 18 मार्च रोजी धुलीवंदन, 21 मार्च रोजी तिथीप्रमाणे शिवजयंती व 22 मार्च रोजी रंगपंचमी हे सण-उत्सव साजरे केले जाणार आहेत. यावेळी गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच जिल्ह्यामध्ये विविध राजकीय पक्ष कामगार संघटना तर्फे त्यांच्या प्रलंबित मागण्यासाठी मोर्चे, धरणे आंदोलने, रास्ता रोको होतात. त्याचप्रमाणे यात्रा उत्सव, धार्मिक कार्यक्रमात गर्दी होण्याची शक्यता असल्याने जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणत्याही किरकोळ घटना वरून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये किंबहुना तशी परिस्थिती निर्माण झाल्यास ती हाताळण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी म्हणून संपूर्ण अहमदनगर शहर व जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी जारी करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com