नगर जिल्हा रेड झोनमध्ये

लॉकडाऊन वाढण्याची शक्यता
नगर जिल्हा रेड झोनमध्ये

मुंबई | Mumbai

राज्यातील 14 जिल्हे हे रेड झोनमध्ये आहेत. त्यामुळे त्याठिकाणी शिथिलता करावी, अशी मागणी केली तर ते होऊ शकत नाही. त्यामुळे जे परिसर हॉटस्पॉट आहेत. त्याठिकाणी कडक लॉकडाऊन करणे महत्त्वाचे ठरणार आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केल्याने नगर जिल्हा सध्या रेड झोनमध्ये असून आगामी काही दिवसात रूग्णांची संख्या न घटल्यास आणखी कडक लॉकडाऊन वाढण्याचे संकेत मिळत आहे.

करोनाच्या दुसर्‍या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात 1 मेपासून लॉकडाऊन करण्यात आले. सुरुवातीला हा लॉकडाऊन 15 दिवसाचा असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, आता हा लॉकडाऊन 31 मेपर्यंत असून आता पुढील नियमावली काय असणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. याबाबत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येत्या चार दिवसात लॉकडाऊनच्या शिथिलतेवर निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे.

राज्यात ज्यावेळी करोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. त्या दरम्यान जनतेकडून लॉकडाऊन लावण्याची मागणी झाली होती. त्यानुसार महाराष्ट्र राज्यात लॉकडाऊन करण्यात आला. परंतु, आता जसजसे करोनावर नियंत्रण मिळवले जात आहे आणि रुग्णसंख्या घटत आहे, त्याप्रमाणे आता पुन्हा एकदा जनतेकडून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्याची मागणी केली जात आहे.

हे 14 जिल्हे रेड झोनमध्ये

अहमदनगर, उस्मानाबाद, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगली, सातारा, यवतमाळ, अमरावती, सोलापूर, अकोला, वाशीम, बीड, गडचिरोली

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com