नगर जिल्हा तापला; पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर

नगरकर हैराण
नगर जिल्हा तापला; पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर

अहमदनगर | प्रतिनिधी

मे महिना येण्याच्या आधीच उष्णतेने लोकांना पिळून काढले असून नगर जिल्ह्यात पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर गेला आहे. मे महिन्यात पारा ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सूर्य आग ओकत असल्याने नगरकर हैराण झाले आहेत.

यंदाच्या हंगामात आतापर्यंत कालचा शुक्रवारचा दिवस सर्वाधिक उष्ण ठरला आहे. उन्हाच्या वाढत्या झळा या दुपारनंतर नाहीतर दिवस उजाडताच सुरू होत आहे. सूर्य आग ओकत असल्याने दुपारच्या वेळी शहरातील मुख्य रस्त्यांवर कमालीचा शुकशुकाट जाणवू लागला आहे. शेती कामांचेही नियोजन कोलमडले आहे. रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने मजूरही दुपारच्यावेळी दांडी करू लागले आहेत. रसवंती गृहे, आईस्क्रीम पार्लर तसेच शीतपेयांची दुकाने ग्राहकांनी फुलू लागली आहेत.

नगर जिल्हा तापला; पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर
'श्रुती हसन'चा ग्लॅमरस अवतार, सोशल मीडियावर धुमाकूळ

देशात पाऊस पाडून वाढणारं तापमान कमी करू शकेल अशी कोणतीही अनुकूल हवामान प्रणाली मोठ्या प्रमाणात नाही. उत्तर भारतातील उष्णतेच्या लाटेच्या झोनमधून उष्ण आणि कोरडे उत्तरेकडील वारे महाराष्ट्रात, विशेषत: विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्र प्रदेशात प्रवेश करत आहेत. याच्यामुळं इथलं दिवसाचं तापमान सामान्यपेक्षा खूप जास्त नोंदवलं जात आहे, असं प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथील वरिष्ठ अधिकाऱ्यानं शुक्रवारी सांगितलं.

नगर जिल्हा तापला; पारा ४४.५ अंश सेल्सिअसवर
'शहनाज गिल'चा किलर लूक, फोटोंवरुन हटणार नाही नजर!

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com