जिल्हाधिकारी म्हणतात, जिल्ह्यास 49 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन प्राप्त

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांची माहिती
जिल्हाधिकारी म्हणतात, जिल्ह्यास 49 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन प्राप्त
File Photo

अहमदनगर | प्रतिनिधी

करोना वाढत्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने रुग्णांसाठी आवश्यक मेडीकल ऑक्सिजनच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे. राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्यासाठी दैनंदिन 50 मेट्रिक टन कोटा ठरवून दिलेला आहे.

त्यानुसार नगर जिल्हयासाठी मंगळवारी एअर लिक्वीड- 27 मेट्रिक टन, लिंन्डे- 19 मेट्रिक टन व टी.एन.एस- 3.5 मेट्रिक टन असे मिळून एकुण 49.5 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन प्राप्त झालेला आहे. 28 एप्रिल रोजी नगर जिल्ह्यास 50 मेट्रिक टन लिक्वीड ऑक्सिजन पुरवठा होणे अपेक्षीत आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे.

Title Name
Corona vaccine : 18 + साठी आज दुपारी ४ वाजेपासून नोंदणी; जाणून घ्या कसे करावे रजिस्ट्रेशन
File Photo

दरम्यान, नगर शहरात काल रात्री एका खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 7 रुग्ण दगावल्याचे म्हटले जात आहे. प्रशासन, पोलीस व महापालिका अधिकारी या घटनेचा तपास करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन मुबलक असल्याचा दावा केला असून अफवांवर न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com