नगर जिल्ह्यावर शुक्रवारपर्यंत जोरदार पावसाचे संकट

शेतकर्‍यांची चिंता वाढली बाप्पांचे विसर्जनही पावसात
नगर जिल्ह्यावर शुक्रवारपर्यंत जोरदार पावसाचे संकट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

राज्यात मागील अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेला पाऊस आता पुन्हा सक्रिय होताना दिसत आहे. राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यासह गुरुवारपासून राज्यभरात मान्सून सक्रिय होऊन पावसाचा जोर वाढण्याची शक्यता, हवामान विभागाने वर्तवली आहे. यात नगर जिल्ह्याचाही समावेश असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. बाप्पाच्या विसर्जनादरम्यानही जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे गणेशभक्तही काळजीत आहेत.

येत्या 3 ते 4 दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांत हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. 5 व्या दिवसापासून राज्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर, गुरुवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करुन दिली आहे.

नगरसह या जिल्ह्यांना इशारा

6 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशीम, बुलढाणा, अकोला, यवतमाळ, अमरावती, वर्धा चंद्रपूर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया

7 सप्टेंबर : पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, नगर, जालना औरंगाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड

8 सप्टेंबर : पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, नगर, उस्मानाबाद, बीड, लातूर, नांदेड, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली

9 सप्टेंबर : सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, रायगड, नगर, हिंगोली, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com