जिल्ह्यात जोरदार पाऊस

जिल्ह्यात जोरदार पाऊस

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

गत तीन दिवसांपासून नगर जिल्ह्याच्या विविध भागात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने नद्या पुन्हा वाहू लागल्या असून धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.

पारनेरात जोरदार पाऊस होत असल्याने मुळा धरणात पाण्याची आवक वाढल्याने या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. भंडारदरा पाणलोटातही पाऊस सुरू असल्याने पाणी सोडण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात पाऊस सुरू असल्याने गोदावरीतील विसर्ग वाढला आहे.

श्रीरामपूर, राहुरी, संगमनेर, राहाता व अन्य भागात जोरदार पाऊस कोसळत असल्याने शेतात पाणीच पाणी झाल्याने शेतकर्‍यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त पिकाचे त्वरीत पंचनामे करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे. अजूनही पावसाचे संकट कायम असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. आजही पावसातच आपल्या लाडक्या गणरायाला जनतेला निरोप द्यावा लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com