ऊस आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसाय शेतकर्‍यांना संजीवनी देणारा

ऊस आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात कुक्कुटपालन व्यवसाय शेतकर्‍यांना संजीवनी देणारा

शिर्डी | Shirdi| राजकुमार जाधव

ऊस (SugarCane)आणि साखर सम्राटांचा जिल्हा (Ahmednagr District) म्हणून ओळख असलेल्या नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात शेतकर्‍यांनी पोल्ट्री व्यवसायाला (Poultry business) पसंती दिली आहे. करोना व्हायरस (Covid 19 Virus) आणि लॉकडाऊनमुळे (Lockdown) मागील आर्थिक वर्ष अनेकांसाठी त्रासदायक गेले असून या संकटामधून बाहेर पडण्यासाठी राहाता (Rahata) तालुक्यातील शेतकरी बांधव जोडव्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाकडे वळाला आहे. मात्र पोल्ट्री खाद्याचे भाव गगनाला भिडल्याने पोल्ट्री व्यवसाय करणारा छोटामोठा शेतकरी आर्थिक संकटाच्या खाईत सापडला असला तरी आजच्या घडीला कुक्कुटपालन व्यवसाय (Poultry business) शेतकर्‍यांना संजीवनी देणारा ठरत आहे.

महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक पोल्ट्री व्यवसाय करणारे शेतकरी नगर जिल्ह्यामध्ये असून यांची संख्या 3 हजारांहून जास्त आहे. गोदावरी प्रवरेच्या तीरावर वसलेल्या राहाता तालुक्यातील ऊस, पेरू, डाळिंब बागायतदार शेतकरी वर्ग आता कुक्कुटपालन व्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळतांना दिसत आहे. जगात सर्वत्र थैमान घातलेल्या करोना आजारावर उत्तम आहार म्हणून गावठी तसेच बॉयलर अंड्याला आणि चिकनला राज्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी होत असून त्यामुळे कोंबडी, अंडी आणि कोंबडीचे मांस याचे बाजारभाव वाढले आहे. जिल्ह्यातील कुक्कुटपालनाच्या माध्यमातून दर 45 दिवसाला एक कोटीपेक्षा जास्त कोंबड्या आणि लाखो टन मांसाचे उत्पादन घेतले जाते. त्यापाठोपाठ राहाता तालुक्यात देखील शेतकर्‍यांनीही कुकुटपालन हा शेती व्यवसायाला जोडव्यवसाय म्हणून निवडला आहे. तालुक्यात आजच्या घडीला लाखोंच्या संख्येने गावरान व कावेरी जातीच्या कोंबड्याचे उत्पादन घेतले जात आहे. कुक्कुटपालक शेतकर्‍यांपैकी जवळपास सगळेच शेतकरी करार पद्धतीने कुक्कुट उद्योग सुरू केले आहे.

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद या ठिकाणी पुरवठा केला जात आहे. मात्र अचानकपणे पोल्ट्री खाद्याला भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. करोना काळात शेतकर्‍यांना संजीवनी देणारा व्यवसाय म्हणून पोल्ट्री व्यवसायाची जोड मिळाली होती.

मागील वर्षी सोयाबीन आणि मका यांचे उत्पादन घटल्याने पोल्ट्री खाद्याचे भाव मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. असे असले तरी कोंबडी आणी अंड्याची मागणी मात्र घटली नाही. परिणामी पोल्ट्री व्यवसायाला द्रुतगती देण्यासाठी शेतकर्‍यांना आर्थिक कर्जाचा बोजा सहन करावा लागत आहे. एका लेयर पॅरेंट बर्थची किंमत जवळजवळ 30 ते 35 रुपये होती परंतु खाद्याचे दर महागल्याने आता 25 रुपयावर येऊन पोहोचली आहे. तसेच शेतकर्‍यांकडून ग्राहकांना सात ते आठ महिण्याची दिड पावणे दोन किलो वजनाची कोंबडी 300 ते 400 रुपयांंपर्यंत विक्री केली जात आहे.

याव्यतिरिक्त कोंबड्यांना वेगवेगळ्या प्रकारचं धान्य द्यावे लागते. याशिवाय त्यांच्या औषधांवरही खर्च करावा लागत आहे. यात विस आठवड्यांपर्यंत कोंबड्यांना खाद्य देण्याचा खर्च साधारणपणे एक ते दिड लाख रुपये आहे. एक लेयर पॅरेंट बर्ड वर्षभरात जवळजवळ 300 अंडी देते. पाच महिण्यांनंतर कोंबड्या अंडी देणं सुरू करतात. वर्षभर अंडी देतात. 20 आठवडे त्यांच्या खाण्या-पिण्यावर जवळजवळ 3 ते 4 लाख रुपये खर्च होतात. त्यातून वर्षाला चांगली कमाई होते हे जरी खरे असले तरी देखील पोल्ट्री फार्मिंगसाठी खाद्य, धान्य, इतर खर्च न परवडणारा असल्याने पोल्ट्री व्यवसायात गुंतवणूक करणार्‍या शेतकर्‍यांची चिंता वाढवणारा आहे.

कोविडपूर्वी काळा रंग, काळी चोच, काळी जिभ, काळे मांस आणि काही प्रमाणात काळं रक्तही अशी ओळख असलेल्या कडकनाथ जातीच्या कोंबड्या तालुक्यातील शेतकर्‍यांना जोडव्यवसायासाठी सोन्याची अंडी देणार्‍या ठरल्या होत्या. मात्र आता त्यांची जागा गावठी आणि कावेरी जातीच्या कोंबड्यांनी घेतली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com